Homeकल्चर +मानाच्या ८ पुरस्कारांनी...

मानाच्या ८ पुरस्कारांनी गुरू संगीताचार्य रुपाली देसाई अलंकृत

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना गुरू संगीताचार्य रूपाली देसाई यांना कथ्थक शैलीतील, श्री गणेशाचे अधिष्ठान, त्यांच्या संगीताचार्य विषयासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मानाच्या एकूण आठ पुरस्कारांनी नुकतेच अलंकृत करण्यात आले आहे.

संगीत क्षेत्रातील गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्करदेखील त्यांनी संपादित केला आहे. गेली अनेक वर्षे त्या एक उत्तम नृत्यांगना म्हणून सुपरिचित आहेतच. गेली २५ वर्षांहून अधिक काळ त्या संस्कृती, नृत्य, कला, मंदिर, दादर येथे अनेक विद्यार्थ्यांना घडवित आहेत. त्यांना तेज तपास्विनी पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. सध्या कथ्थक नृत्यशैलीतील श्री गणेशाचे अधिष्ठान हा त्यांचा पीएचडी विषयावर आधारित कार्यक्रम गाजत आहे. त्या कार्यक्रमाच्या नृत्य दिग्दर्शनाची बाजू त्यांच्या ज्येष्ठ शिष्या दिशा देसाई यांनी समर्थपणे केली आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content