Homeकल्चर +८ मेपासून 'अल्ट्रा...

८ मेपासून ‘अल्ट्रा झकास’वर रंगणार ‘थरार प्रेमाचा-अथिरन’

हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरू करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीने ‘थरार प्रेमाचा-अथिरन’ डिजिटल प्रीमियरची घोषणा केली आहे. ८ मेपासून या चित्रपटाचा थरार रंगणार आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बहुचर्चित ठरलेल्या ‘अथिरन’ या मल्याळम भाषेतील चित्रपटाचा मराठीत डब केलेला ‘थरार प्रेमाचा-अथिरन’ हा चित्रपट एक्स्लुझिवली अल्ट्रा झकास ओटीटी अॅपवर पाहता येणार आहे. पुष्पाफेम अभिनेता फहाद फासिल, अभिनेत्री साई पल्लवी, अभिनेता अतुल कुलकर्णी आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक विवेक यांनी केलं आहे. भूतकाळातल्या घटनांमध्ये अडकलेल्या आणि उपचारासाठी एका रुग्णालयात डांबून ठेवलेल्या नित्याच्या सुटकेचा मनोरंजक थरार प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

कलाकारांची उत्तम फळी लाभलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाची रहस्यांनी आणि थराराने परिपूर्ण कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. दाक्षिणात्य सिनेविश्वात बहुचर्चित असणारा हा चित्रपट आम्ही मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. ‘अल्ट्रा झकास’च्या माध्यमातून जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यत तो पोहोचवण्याकरीता आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट व अल्ट्रा झकासचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या.

App link: https://ultrajhakaas.app.link

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/p/CrvbdFYIb5J/

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content