Homeमुंबई स्पेशलभाजपाच्या नव्या प्रदेश...

भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीस निमंत्रित!

भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यकारिणी आज घोषणा करण्यात ली. यामध्ये कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे, विजयाताई रहाटकर यांच्यासह उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. 

भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.

भाजपाच्या उपाध्यक्षपदी माधव भांडारी,  सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी आ. रणधीर सावरकर,  अ‍ॅड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी भरत पाटील, अ‍ॅड. वर्षा डहाळे, अरुण मुंडे, महेश जाधव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी आ. मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय संघटनमंत्रीपदी उपेंद्र कोठेकर (विदर्भ), मकरंद देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र), संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण), हेमंत म्हात्रे (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, याखेरीज केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हिना गावित, राज्यातील सर्व खासदार, आमदार आदींचा समावेश आहे. याखेरीज २८८ विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक आणि ७०५ मंडलांचे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

राज्यातील १ कोटी नागरिकांशी संपर्क साधून त्यांना ‘सरल अ‍ॅप’द्वारे मोदी सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती दररोज देण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या संपर्क अभियानात सहभागी होत आहेत, असेही ते म्हणाले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, महाविजय अभियानाचे संयोजक आ. श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, अ‍ॅड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश समन्वयक विश्वास पाठक आदी उपस्थित होते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content