भारताच्या संविधानाच्या रक्षणासाठी आणि राज्यातल्या सरकारविरोधात महाविकास आघाडी गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर आवाज उठवत आहे. महाराष्ट्रात ह्याआधी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे संविधानाच्या रक्षणासाठी ‘वज्रमूठ’ सभा झाल्या. त्यानंतर आता महाविकास आघाडीची पुढची ‘वज्रमूठ’ सभा महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून, १ मे २०२३ रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे होणार आहे.
ह्या सभेच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या पुढाकाराने महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवासैनिक ह्या नियोजनात सहभागी झाले आहेत. १ मे २०२३ रोजी, वांद्रे येथील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बि के सी येथे सायंकाळी ५.३० वाजता ‘वज्रमूठ’ सभेला सुरुवात होईल. राज्यभरात महाविकास आघाडीला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद मुंबईत कळस गाठेल आणि अतिभव्य अशी सभा होईल, अशी खात्री आयोजक व्यक्त करत आहेत.