Homeमुंबई स्पेशलसोमवारी माहीम, शिवाजी पार्क, वरळीत...

सोमवारी माहीम, शिवाजी पार्क, वरळीत ड्रोन उड्डाणांना बंदी

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर ०१ मे २०२३ रोजी माहीम, शिवाजी पार्क आणि वरळी पोलीसठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाण क्रियांना प्रतिबंध असल्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी काढले आहेत.

या परेड समारंभाच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उत्सवासाठी एकत्र येणे अपेक्षित आहे. त्याकरिता शिवाजी पार्क परिसरातील अवांछित कारवाया रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश ०१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

Continue reading

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...
Skip to content