Homeकल्चर +जय महाराष्ट्र नगर...

जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला २६ एप्रिलपासून!

ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४० वर्षांपासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे ४१वे वर्ष आहे. यंदाची जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला बुधवार, २६ एप्रिल २०२३पासून सुरू होत असून रविवार, ३० एप्रिल २०२३पर्यंत ती चालणार आहे. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी ७.३० वाजता ही व्याख्यानमाला विनामूल्य असून जास्तीतजास्त रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक विजय वैद्य आणि प्रा. नयना रेगे यांनी केले आहे.

नेहमीप्रमाणे यंदाही या वसंत व्याख्यानमालेत ‘शारदा पुरस्कार’ आणि ‘जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार’ देण्यात येणार असून लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांना ‘शारदा पुरस्कार’ तर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणारे राकेश वायंगणकर याना ‘जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. नाटककार विद्याधर गोखले, महाराष्ट्र शाहीर साबळे, पंडित कुमार गंधर्व, नाटककार वसंत कानेटकर, पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘स्मरण रंजन’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाने जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बुधवार, २६ एप्रिल २०२३ रोजी गुंफण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध गायक श्रीरंग भावे, निवेदन श्रेयसी मंत्रवादी, संगीत संयोजन प्रशांत ललित, गायिका केतकी भावे जोशी, ध्वनी संयोजन रवींद्र माळवदे हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत.

देशासमोर असलेल्या ज्वलंत समस्यांना हात घालणारे दुसरे पुष्प गुरुवार, २७ एप्रिल २०२३ रोजी गुंफण्यात येणार आहे. ‘नोकरी मिळवा, बेकारी संपवा’ या विषयावर समूपदेशन ज्येष्ठ समूपदेशक प्रा. सुहास पाटील करणार आहेत. शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस आणि शिवसेना विभाग प्रमुख उदेश पाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय सैन्य दलातील निवृत्त जवान, शौर्यपदक सन्मानित मधुसूदन सुर्वे यांची शौर्यगाथा वसंत व्याख्यानमालेत तिसऱ्या पुष्पाद्वारे शुक्रवार, २८ एप्रिल २०२३ रोजी डॉ. सुचिता पाटील या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार आहेत. यावेळी एक विशेष चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मराठी नाटकांच्या सुवर्ण काळातील एक धावती सफर शनिवार, २९ एप्रिल २०२३ रोजी वसंत व्याख्यानमालेत चौथ्या पुष्पाद्वारे अनुभवायला मिळणार आहे. जुनी नाटके, कलावंत, अभिनय, लेखन, आठवणी आणि त्यावर खुसखुशीत शैलीत विवेचन चंद्रशेखर ठाकूर करणार आहेत. या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा समारोप रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी जगातील विविध वाद्द्यांचा संग्रह करण्याचा छंद जोपासणारे वाद्यप्रेमी मधुर पडवळ यांच्यासमवेत कर्णमधुर वाद्यगप्पांनी होणार आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content