Homeमुंबई स्पेशलअजितदादांची पावले भाजपाच्या...

अजितदादांची पावले भाजपाच्या दिशेने?

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीचा हवाला देत संजय राऊत यांनी आज केलेल्या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पावले भारतीय जनता पार्टीच्या दिशेने पडू लागली आहेत की काय, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी जवळजवळ दीड तास चर्चा केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेदेखील यावेळी उपस्थित होत्या. या बैठकीचा तपशील तेव्हातरी कोणी उघड केला नसला, तरी आज संजय राऊत यांनी त्यांच्या लेखात शरद पवारांच्या वक्तव्याचा हवाला देत असे म्हटले की, पवार म्हणाले- माझ्या कुटुंबातल्या सदस्यांवर पक्ष सोडण्याच्या दृष्टीने प्रचंड दबाव येत आहे. मात्र पक्ष सोडण्याचा जर एखाद्या सदस्याचा निर्णय असला तर तो त्याचा असेल. पक्ष म्हणून आपण भाजपाबरोबर कधीही जाणार नाही.

अमित शाहना भेटल्याचा दादांकडून इन्कार

एकीकडे संजय राऊत यांनी असे भाष्य केले असले तरी अजित पवार मात्र महाविकास आघाडीच्या नागपूर येथील वज्रमूठ सभेला हजर राहण्यासाठी तेथे पोहोचले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देण्याकरीता ते आले होते. या दौऱ्यात शनिवारी शाह यांनी भाजपा नेते विनोद तावडे यांची त्यांच्या मातोश्रींच्या निधनानिमित्त भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी महापालिका तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला असे बोलले जाते. कालच अजित पवार यांनी अमित शाह यांची छुपी भेट घेतली असल्याची चर्चा होती. मात्र अजित पवार यांनी त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.

मतभेद पुन्हा उघड

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवले तरीही हे सरकार पडणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली. त्याचवेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (ठाकरे गट) अंबादास दानवे यांनी मात्र तसे झाल्यास हे सरकार कोसळेल असा दावा केला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांचा अंदाज चुकणार असल्याचे सांगत आपणही दानवे यांच्या मताशी सहमत असल्याचे दाखवून दिले.

———–००————-

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content