Homeकल्चर +प्रा. विमलताईंचा स्मृतीदिन...

प्रा. विमलताईंचा स्मृतीदिन एकाचवेळी चार ठिकाणी संपन्न

विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. विमलताई गाडेकर यांचा द्वितीय स्मृतीदिन मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह महाराष्ट्रात एकाचवेळी चार ठिकाणी संपन्न झाला.

सकाळी साडेदहा वाजल्यापासून अनेक कार्यक्रम सादर झाले. यात प्रा. विसुभाऊ बापट यांचा विश्वविक्रमी जागतिक एकपात्री काव्यनाट्यानुभव ‘कुटूंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमासह चंद्रपूर जिल्ह्यातून कर्तृत्त्व गाजविणाऱ्या निवडक मान्यवरांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम ‘विमलताई गाडेकर स्मृती सोहळा’ समितीने आयोजित केला होता.

विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. विमलताई गाडेकर या चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापक होत्या. त्यांचे आतापर्यंत अनेक कवितासंग्रह आणि कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या साहित्यावर गोंडवाणा विद्यापिठातील काही विद्यार्थी पीएचडी करीत आहेत. आंबेडकरी साहित्यात त्यांच्या साहित्याचा आणि कार्याचा नेहमीच आदराने उल्लेख केला जातो. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

प्रा. विमलताई गाडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी चंद्रपूर येथे निमंत्रितांचे कवि संम्मेलन आयोजित केले होते. या वर्षी द्वितीय स्मृतीदिनी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दिवशी स्टार प्रवाहाचे क्रिएटिव्ह हेड नरेंद्र मुधोळकर, भिक्खु विनय बोधीप्रिय महाथेरो, नांदेड, यांच्या उपस्थितीत प्रा. विमलताई गाडेकर यांच्या कार्याचे स्मरण केले गेले. प्रा. विमलताई गाडेकर लिखित माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘चंदनी दरवळ’ या सुशिल सहारे दिग्दर्शित आणि ॲड. चौताली बोरकुटे-कटलावार यांनी अभिनय केलेल्या अभिनाट्याचे सादरीकरण झाले. चंद्रपूर येथे प्रा. विमलताई गाडेकर यांचे अप्रकाशित साहित्य ‘कोवळे कंच’ आणि त्यांच्या आठवणी जागविणारे ‘विमलताई गाडेकर-व्यक्ती आणि वाड.मय’ या दोन संग्रहांचे प्रकाशन झाले.

चंद्रपूरच्या कर्तृत्त्वाचा गौरव!

चंद्रपूर जिल्ह्यातील मुंबईत स्वकर्तृत्त्वावर मोठ्या पदांवर गेलेल्या पाच मान्यवरांचा यावेळी गौरवोल्लेख करण्यात आला. यात महानिर्मिती येथे सौर प्रकल्प विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या अर्चना राणे – चोपडे यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले. मुंबई विद्यापिठाच्या जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांचा उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मान करण्यात आला. राज्यशासनाचे विधि सल्लागार तथा मंत्रालयातील विधि व न्याय विभागाचे सहसचिव नितीन जिवने यांना विधि क्षेत्रातील कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. महामुंबई मेट्रो ऑपरेशन लिमिटेड येथे संचालक (फायनान्स) मुंबई निखिल मेश्राम यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवोल्लेख करण्यात आला. तर, कोकण प्रादेशिक विभाग, ठाणे येथील सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. या पाचही सन्माननीय व्यक्ती चंद्रपूरच्या आहेत. या सर्वांचे प्रेरणास्थान, स्मृतिशेष प्रा. विमलताई गाडेकर यांच्या आदर्शांना, आशिर्वादांना, शिकवणुकींना सार्थसिद्ध झाल्याबद्दल  मानपत्र साभिमान बहाल करण्यात आले.

प्रा. विमलताई गाडेकर यांची कन्या अर्चना शंभरकर माहिती जनसंपर्क महासंचालनालय येथे वरिष्ठ सहायक संचालक आहेत आणि मुलगा जयंत गाडेकर सिने अभिनेता आहे. मोठा मुलगा डॉ. हेमंत भोपाळ येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन वैद्यकीय विद्यापिठाचे प्र-कुलगुरू आहेत तर छोटी मुलगी डॉ. मोना या ‘अर्गोकेअर’ या व्यवसायिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content