Homeकल्चर +डॉ. संजय उपाध्ये...

डॉ. संजय उपाध्ये यांचा सोमवारी ‘मन करा रे प्रसन्न’!

मुंबईतल्या लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये यांचा मन उल्हासित करणारा अनोखा मनोरंजक असा ‘मन करा रे प्रसन्न’ हा कार्यक्रम येत्या सोमवारी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी, २० मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता स्वा. सावरकर पटांगण, लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर, राम मंदिर रस्ता, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासारखे अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. आपले विचारच आपल्याला घडवत असतात. तसेच आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रतिनिधित्व आपले विचारच करत असतात. माणसाच्या दुःखाचे मूळ त्याच्या चुकीच्या विचारपद्धतीत शोधून आयुष्य कसे जगावे, अशी नवी हास्यथेरपी डॉ. संजय उपाध्ये यांनी आपल्या ‘मन करा रे प्रसन्न’ या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण समाजासमोर मांडली आहे. या कार्यक्रमाचा वेग तासाला ६० स्माईल्स इतका आहे.

आपण बिनशर्त स्वतःचा स्वीकार करून स्वतःकडून टोकाच्या अपेक्षा करण्यापेक्षा हे भयंकर आहे, परंतू एव्हढेही वाईट नाही असा विचार करावा. अतिरेकी विचारांचा ताबा विवेकनिष्ठ विचारांना घेऊ द्यावा. असे केल्यास आनंदाने जगणे निवडता येऊ शकते. स्वतःचा माणूस म्हणून स्वीकार करुन स्वतःवर प्रेम करा. आयुष्य कसे जगावे असे सांगणारा एक नॉनअध्यात्मिक प्रवचन, ज्ञान, अध्यात्म, मनोरंजन आणि प्रबोधन यांचा अपूर्व संगम असलेला हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह महेश काळे व डॉ. रश्मी फडणवीस यांनी केले आहे.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content