Homeकल्चर +मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट...

मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ मार्चपासून!

येत्या १४ ते १८ मार्च दरम्यान ‘मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे.

मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष कमांडर शांगप्लियांग यांनी नुकतीच याची घोषणा केली. मेघालय अतिशय निसर्गसुंदर, शांतपूर्ण आणि अनेक रमणीय स्थळे असलेला प्रदेश आहे. कोलकाता, दिल्लीवरून शिलाँगसाठी थेट फ्लाईटही आहेत. इथले चित्रपटकर्मी तिथे चित्रिकरणासाठी आले तर त्यांना मेघालय सरकारकडून सहकार्य मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मेघालयमध्ये पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ६५हून अधिक चित्रपट आणि लघुपटही दाखवण्यात येणार आहेत. मेघालय चित्रपट धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही कमांडर शांगप्लियांग यांनी यावेळी सांगितले.

डॉ. हरजीत सिंह आनंद (इंडो युरोपियन बिझनेस कौन्सिल चेम्बर ऑफ कॉमर्सचे संस्थापक), आयपीएस अधिकारी मोहन राठोड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात महोत्सवाचा लोगो आणि अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पंकज बेरी, मानव सोहल, श्रावणी गोस्वामी, ब्राइट आऊटडोअर मीडिया लिमिटेडचे योगेश लखानी, अर्चना जैन, एकता जैन, शिवम मिश्रा, सेलेब्रिटी ॲस्ट्रॉलॉजर नरेंद्र शास्त्री उपस्थित होते. एबीके मीडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक संचालिका अरुणा चक्रवर्ती यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content