Homeकल्चर +‘पारिजात’च्या अभिवाचन स्पर्धेत...

‘पारिजात’च्या अभिवाचन स्पर्धेत चेंबूर हायस्कूल पहिले

मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. मराठी भाषा दिनानिमित्ताने मुंबईच्या पारिजात संस्थेतर्फे “गोष्ट मराठीची”, या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी सांघिक कथा अभिवाचन स्पर्धा २५ फेब्रुवारी २०२३ रोजी दादरच्या नविनचंद्र मेहता इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलेपमेंट येथे घेण्यात आली. त्यात इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी ह्या दोन्ही गटांमधून चेंबूर येथील चेंबूर हायस्कूल, या शाळेने प्रथम क्रमांक मिळविला.

शालेय विद्यार्थ्यांसाठी अशी आगळीवेगळी अभिवाचनाची स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात पारिजाततर्फे तिसऱ्यांदा घेण्यात आली. स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांचे कथासंग्रह आणि कादंबरी यांचे वाचन केले. हा उपक्रम राबविण्यामागे वाचन संस्कृती मुलांमध्ये रुजावी, त्यांच्यात मराठी साहित्याची आवड आणि मराठी भाषेबद्दल गोडी वाढावी हा पारिजातचा हेतू आहे. याबद्दल शिक्षक आणि पालकांनीही खूपच समाधान आणि आनंद व्यक्त केला. सर्वच शाळांनी या उपक्रमाचे आणि पारिजात संस्थेचे मनापासून स्वागत केले.

ह्या स्पर्धेत एकूण १५ शाळांमधून ८८ विद्यार्थी सहभागी झाले होते. पाचवी ते सातवीचे १६ संघ आणि आठवी ते दहावीचे १० संघ असे एकूण २६ संघ सहभागी झाले होते. ह्या स्पर्धेस परीक्षक म्हणून लाभलेले सिनेकलाकार अक्षय शिंपी आणि निलेश माने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कथा अभिवाचन बद्दलचे मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरण समारंभास नविनचंद्र मेहता इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलेपमेंट ह्या संस्थेचे व्यवस्थापक प्रीतम वारके आणि रसिका मल्ल्याळ, कला व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि पारिजातचे स्नेही असे जवळपास २५०पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले आणि भरभरून प्रतिसाद दिला.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व पारिजात इतर उपक्रमासोबत जोडण्यासाठी संस्थेच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला भेट द्या.

https://www.facebook.com/ParijatMumbai1/

https://instagram.com/parijatmumbai

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content