Homeकल्चर +डॉ. आंबेडकर जयंतीला...

डॉ. आंबेडकर जयंतीला सुरू होणार पर्यटक सर्किट ट्रेन!

राष्ट्रीय संस्कृती महोत्सव यावेळी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. आणि हा महोत्सव प्रत्येकासाठी नक्कीच एक दृश्य आणि संगीतमय मेजवानी असेल असेल. काल या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलपासून विशेष पर्यटक सर्किट ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी यावेळी केली.

आंबेडकर

या  उद्घाटन समारंभाच्या रंगारंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री जी. किशन रेड्डी होते. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय संस्कृती महोत्सव ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या मंत्राचा चिरस्थायी संदेश देतो. भाषा आणि सांस्कृतिक अभिव्यक्तींमध्ये असंख्य विविधता असूनही भारत एकसंघ आहे हे हा संदेश दर्शवतो, असे राज्यपालांनी सांगितले. हा महोत्सव कुंभमेळ्याप्रमाणे जगप्रसिद्ध व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात 11 ते 19 फेब्रुवारीदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सुमारे 1000 कलाकार आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. क्राफ्ट (हस्तकला), कल्चर (संस्कृती) आणि क्विझीन (खाद्य संस्कृती) या 3 ‘सी’च्या माध्यमातून, विविध राज्यांच्या संस्कृतींना एकमेकांशी आणि सामान्य नागरिकांशी जोडणे, हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. तेजस्विनी साठे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कथ्थक, या शास्त्रीय नृत्य प्रकारच्या सादरीकरणाने उद्घाटन समारंभात रसिकांना मंत्रमुग्ध केले. नर्तकांच्या पथकाने प्रेक्षकांना जलद, लयबद्ध, आणि भावपूर्ण शास्त्रीय नृत्याच्या प्रवासाचा अनुभव दिला. ख्यातनाम गायक मोहित चौहान यानं ‘तुमसे ही, 25 साल का सुरिला सफर’ (25 वर्षांचा संगीतमय प्रवास) या आपल्या कार्यक्रमात अनेक गाण्यांचे सुमधुर सादरीकरण केले.

या महोत्सवात संपूर्ण भारतातील जवळजवळ 350 लोककलाकार आणि आदिवासी कलाकार, जवळजवळ 300 स्थानिक लोककलाकार, काही ट्रान्सजेंडर कलाकार आणि दिव्यांग कलाकार, ख्यातनाम शास्त्रीय कलाप्रकारांचे सादरकर्ते, यांच्यासह प्रसिद्ध कलाकार आपल्या चित्ताकर्षक सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.

या कलाकारांव्यातिरिक्त, भारतातील सर्व राज्यांमधून आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रांमधून सुमारे 150 कारागीरांना, ‘आंगन’ अंतर्गत त्यांच्या कला आणि हस्तकला प्रकारांची विक्री आणि प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले असून, यासाठी सुमारे 70 स्टॉल उपलब्ध केले आहेत. महाराष्ट्र राज्य हातमाग विभाग आणि स्टार्टअप्ससाठी 25 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

हा महोत्सव म्हणजे, कला, संगीत, खाद्यपदार्थ आणि इतर अनेक गोष्टींचा कॅलिडोस्कोप असेल, ज्यामुळे पर्यटकांना भारताच्या सांस्कृतिक वारशाची समृद्धता अनुभवायची उत्तम संधी मिळेल. हा महोत्सव अभ्यागतांना भारतातील विविध सांस्कृतिक अभिव्यक्ती जाणून घेण्यासाठी आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची सखोल प्रशंसा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.

दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले जाते. 2019मध्ये मध्य प्रदेशात, 2022मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आणि आता महाराष्ट्रात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.

सकाळी 11:00 ते रात्री 10:00 – हस्तकला आणि कला प्रदर्शन.

दुपारी 02:30 ते 03:30 – स्थानिक कलाकारांचे मार्शल आर्टचे सादरीकरण

दुपारी 04:00 ते 05:30 – स्थानिक कलाकारांचे सादरीकरण

संध्याकाळी 06:00 ते 06:45 –  पारंपरिक, आदिवासी आणि लोकनृत्य नृत्य सादरीकरणासह

संध्याकाळी 07:00 ते रात्री 08:15 – प्रसिद्ध शास्त्रीय कलाकारांचे कार्यक्रम

रात्री 08:30 ते रात्री 10:00 – प्रसिद्ध तारेतारकांचे कार्यक्रम.

हा QR कोड स्कॅन करून दैनंदिन घडामोडींचे तपशील येथे पाहावेत.

कार्यक्रमाच्या ठिकाणी मैदानावर फूड कोर्ट उभारण्यात आले असून, या 37 स्टॉलना भेट देणाऱ्यांसाठी भारतभरातील खाद्यपदार्थांचे प्रकार, स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच भरड धान्याचे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिक आणि कलाप्रेमींना प्रवेश विनामूल्य आहे. हा अनोखा सांस्कृतिक अनुभव चुकवू नका आणि या संगीतमय आणि सांस्कृतिक प्रवासाचा आनंद घ्या.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content