Homeमुंबई स्पेशलराजकीय वलय भेदणाऱ्या...

राजकीय वलय भेदणाऱ्या कलाकार गौरी पाठारे…

एकीकडे विविध राजकीय नेत्यांची मुले-मुली आई-वडिलांच्या राजकीय कमाईच्या तव्यावर स्वतःच्या राजकीय पदार्पणाच्या पोळ्या भाजत असताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या कन्या गौरी पाठारे यांनी वेगळी वाट चोखाळत स्वतःची एक कलाकार म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

तरुणाईचे आकर्षण असलेला मुंबईतल्या काळा घोडा महोत्सवात वाँडरींग व्‍हाईट्स हँडक्राफ्टेड ज्वेलरीच्या संस्थापक गौरी पाठारे यांनी आपली कलाकृती सादर केली आहे. ‘द रायझिंग ऑफ फिनिक्स’ ही टाकाऊ वस्तूंमधून साकारलेली त्यांची आकर्षक कलाकृती पाहण्यासाठी काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये कलाप्रेमी आणि मुंबईकरांनी गर्दी केली आहे.

त्या एक अपारंपरिक कलाकार असून पीतळ आणि तांब्याचा औद्योगिक कचरा, अपसायकल केलेले चामडे, नदीतील दगड-खडक, हाडे आणि नैसर्गिक तंतू यांचा विविध पद्धतीने पुनर्वापर करून त्या स्वतः हे अनोखे दागिने बनवतात. हे आगळेवेगळे दागिने बनवताना यंत्र-तंत्राचा कमीतकमी वापर आणि हाती केलेली कारागिरी जास्त असते. त्यांनी शाश्वत साहित्याचा वापर करून घालण्यायोग्य कलाविष्कार साध्य केला आहे. त्या असे म्हणतात की, जगात शक्य तितके कार्बन फूटप्रिंट कमी करून, प्रदूषण कमी करून एक निरामय प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात हे त्यांचे एक छोटेसे कलात्मक योगदान आहे.

काळा घोडा कला महोत्सवातील ‘द रायझिंग ऑफ फिनिक्स’ हे त्यांचे दुसरे सादरीकरण आहे. हे साकारताना गौरी पाठारेंनी यांनी टाकून दिलेले, मोडीत काढलेले आणि वाया गेलेले सामान वापरले आहे. निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या ह्या वस्तूंना त्यांनी जणू एक नवे जीवन, नवा अर्थ दिला आहे. गोदीतील गियर्स, जुन्या विंडो एसी, तुटलेली कार क्लच प्लेट, कॉपर एसी पाईप्स, फॅब्रिकेटरच्या कचऱ्यापासून पितळी प्लेट्स, इलेक्ट्रॉनिक मेटल वेस्ट, अगदी तुटलेले गोदरेज कुलूपदेखील या कलाकृतीत नव्या अंदाजाने सामावले गेले आहे. त्यांचे आगळेवेगळे दागिने बनवताना ह्या टाकाऊ ठरविलेल्या वस्तूंचा हा पुनरुज्जीवनाचा प्रवास ह्या इन्स्टॉलेशनमधून आपल्यासमोर आला आहे. मोडीत काढलेल्या वस्तूंचे एखाद्या फॅशनिस्टाच्या अनुपम दागिन्यांमध्ये केलेले हे अद्भुत रूपांतर म्हणजे जणू राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्षाची भरारीच!

याबद्दल अधिक जाणून घ्याः

https://www.instagram.com/wandering_whites/

https://wanderingwhites.com

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content