Homeकल्चर +मुंबई मराठी पत्रकार...

मुंबई मराठी पत्रकार संघात उद्या ‘रागदारी स्वरलतेची’!

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ‘रागदारी स्वरलतेची’ या आगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन येत्या सोमवारी, दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या पत्रकार भवनात करण्यात आले आहे.

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत समीक्षक पं. अमरेंद्र धनेश्वर व मुक्ता रास्ते हे या कार्यक्रमात, लतादीदींच्या अजरामर चित्रपट गीतांमधील रागदारीच्या प्रात्यक्षिकांसह गीते सादर करतील. संदीप मिश्रा (सारंगी), मुक्ता रास्ते (तबला), जयंत नायडू (तानपुरा) हे कलाकार त्यांना साथसंगत करणार असून पद्मजा दिघे सूत्रसंचालन करतील. अवीट गोडीच्या या गीतांची पार्श्वभूमी, इतिहास आदींबाबतही रंजक माहिती यावेळी देण्यात येईल. काही गीते ध्वनीफितींच्या माध्यमातून दीदींच्या आवाजात ऐकविली जातील.

पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य यांच्या संयोजनातून साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना पत्रकार संघाने वाहिलेली भावांजली होय! आझाद मैदान (सीएसटी रेल्वे स्थानकानजिक) येथील पत्रकार भवनात होणारा हा रंगतदार कार्यक्रम सर्व जनतेसाठी विनामूल्य खुला आहे. सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे तसेच कार्यवाह संदीप चव्हाण यांनी केले आहे.

संपर्क- २२६२०४५१/२२७००७१५

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content