Homeकल्चर +मराठी साहित्य संमेलनात...

मराठी साहित्य संमेलनात ‘स्टोरीटेल’च्या ऑडिओबुक्सचा खजिना!

वर्धा येथे आजपासून सुरू होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्टोरीटेलने खास सहभाग घेतला असून येथील दालनात पाच हजारांहून जास्त ऑडिओबुक्सचा खजिना खुला केला आहे.

स्टोरीटेल इंडियाचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ म्हणाले की, ९६वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन साजरे करण्यासाठी स्टोरीटेल विशेष योजना घेऊन येत आहेत. अवघ्या पाचशे रुपये वार्षिक वर्गणीत पाच हजारांहून अधिक मराठी ऑडिओबुक्सचा खजिना या दरम्यान साहित्यप्रेमी, दर्दी रसिक अनुभवू शकतील. स्टोरीटेलवर, अनेक भाषांमध्ये तसेच भारतात ११ प्रादेशिक भाषांमध्ये ‘ऑडिओबुक्स उपलब्ध असून वार्षिक वर्गणी 999/- आहे. पण साहित्य संमेलनातील स्टॉलवर वर्गणी भरणाऱ्यांसाठी स्टोरीटेलने 50% सवलत जाहीर केली आहे आणि फक्त रू 500/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

डिजीटल तंत्रज्ञानाच्या विकासामुळे माहिती आणि ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी खुला झाला. सर्वसामान्यांच्या हातात स्मार्टफोन दिसू लागला आणि त्यातून आपल्या मातृभाषेतील साहित्य लोक वाचू, ऐकू आणि पाहू लागले. माहितीच्या या महाजालात मराठी ही जगातील आघाडीची भाषा ठरते आहे, याचे कारण अनेक मराठी रसिक इंटरनेटवर मराठी भाषेचा वापर करू लागले आहेत. स्टोरीटेलने गतवर्षी नाशिक येथे संपन्न झालेल्या साहित्यसंमेलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून साहित्य रसिक श्रोत्यांसोबत संवाद साधला. या खास काळासाठी विशेष सवलत योजना तयार करून रसिकांच्या आवडीनिवडींचा धांडोळा घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद घडला.

या प्रसंगी साहित्य रसिकांसोबत संवाद साधताना स्टोरीटेल मराठीचे प्रसाद मिरासदार म्हणाले की, मराठी भाषिकांनी माहिती व ज्ञान मिळवण्यासाठी मराठी भाषेतून आंतरजालातील सर्व व्यवहार केले पाहिजेत तरच मराठी भाषा या नव्या डिजीटल युगात टिकेल, वाढेल एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर वापरली जाईल. मराठी भाषिक जगातील जवळजवळ सर्व देशांत पसरलेला आहे. परराज्यात किंवा परदेशात मराठी टिकवायची असेल तर या भाषेत ऐकले किंवा बोलले गेले पाहिजे.

स्टोरीटेलने मराठीतील पाच हजारांहून अधिक सर्वोत्तम पुस्तके ऑडिओ स्वरूपात मोबाईलवर उपलब्ध करून देऊन मराठी भाषा संवर्धनाचे मोठे काम केले आहे. यामुळे मराठी भाषिक आपल्या स्मार्टफोनवर जगात कुठेही, कितीही आणि कधीही मराठी भाषा ऐकू शकतात. आपल्या देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या अनेक महाराष्ट्रीय सैनिकांनी आम्ही स्टोरीटेलच्या माध्यमातून मराठी भाषा ऐकतो आणि आम्हाला मातृभाषेतून संवाद साधण्याचा आनंद मिळतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

स्टोरीटेलवर अनेकानेक ऑडिओबुक्स ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content