मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आचार्य एस्. एन्. रातांजनकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘युवा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

यात वरदराज भोसले यांच्या सतारवादनाचा आणि श्रुती बुजरबरूवा यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात सादर करण्यात येणार आहे. वरदराज भोसले यांना तबल्याची साथ यशवंत चव्हाण करतील. श्रुती बुजरबरूवा यांना तबल्याची साथ यशवंत वैष्णव करतील आणि संवादिनीची साथ ओम्कार अग्निहोत्री करतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थितर राहवे, असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

