Homeमुंबई स्पेशलमाघी गणेशोत्सव साजरा...

माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या जुन्या मंडळांना ताबडतोब परवानगी

मुंबईत यंदाचा माघी गणेशोत्सव उद्या, २५ जानेवारी २०२३ पासून साजरा होणार आहे. या माघी गणेशोत्सवादरम्यान असलेला अल्प कालावधी व त्यानंतर लगेचच साजरा होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वतयारीमध्ये पोलिसांची असलेली व्यग्रता विचारात घेऊन माघी गणेशोत्सवासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी ज्या मंडळांना गतवर्षी परवानगी देण्यात आली आहे, अशा मंडळांचे अर्ज स्थानिक / वाहतूक पोलिसांकडे न पाठवता, मागील वर्षीची परवानगी ग्राह्य धरुन विभाग कार्यालयांमार्फत छाननी करुन परवानगी देण्यात येणार आहे. नव्याने / प्रथमतः अर्ज करणाऱ्या मंडळांच्या अर्जांच्या बाबतीत मात्र स्थानिक / वाहतूक पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभागात माघी गणेशोत्सवादरम्यान उभारावयाच्या कृत्रिम तलावांबाबत आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार यथायोग्य सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येईल. माघी गणेशोत्सवादरम्यान मंडप उभारणीच्या परवानगीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे असंगणकीय कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल.

माघी

कोविड – १९ किंवा त्या अनुषंगिक विविध प्रकारांच्या प्रादुर्भावाचा किंवा पुनरुद्भवाचा संभाव्य धोका विचारात घेता, शासनाने उत्सव कालावधीत ‘कोविड – १९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केल्यास, सदर परिस्थितीत त्यांचे पालन केले जाईल, अशा आशयाचे हमीपत्र मंडळांकडून स्वीकारणे आवश्यक असेल.

महानगरपालिका आयुक्तांनी माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणा-या मंडपाचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. यास्तव, फक्त याच वर्षापुरते माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मंडपांसाठी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास मंजुरी दिली आहे. तथापि, विभाग कार्यालयामार्फत परिपत्रक निर्गमित होण्यापूर्वीच माघी गणेशोत्सवाच्या मंडपासाठी सशुल्क परवानगी दिली गेली असल्यास शुल्क परताव्याची कार्यवाही करण्याचे निर्देश २३ जानेवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकांन्वये देण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माघी श्री गणेशोत्सवादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस दल यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सुचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहनदेखील पालिकेद्वारे करण्यात आले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content