Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिकेची स्वच्छता...

मुंबई महापालिकेची स्वच्छता स्पर्धा, २९ जानेवारीपर्यंत घ्या भाग!

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे होणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण २०२३मध्ये मुंबई महानगरपालिका भाग घेत आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशिष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार पालिका क्षेत्रात विविध गटांमध्ये स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

या अंतर्गत पालिकेच्या २४ विभागामधील हॉटेल्स, शाळा, रुग्णालये (आरोग्यसेवा सुविधा), निवासी संकुल, शासकीय कार्यालये आणि बाजार संघटना यामध्ये स्वच्छता स्पर्धा राबवविली जाणार आहे. तसेच मुंबईतील नागरिकांकडून ‘स्वच्छ भारत मिशन’ या विषयावरील जिंगल, चित्रफीत, पोस्टर / रेखांकन, भीत्तीचित्रे, पथनाट्ये इत्यादी आणि ‘स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज’ अंतर्गत व्यक्ती, स्टार्ट-अप, कंपन्या, शैक्षणिक संस्थांकडून सामाजिक समावेश, शून्य कचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पारदर्शकता (डिजिटल सक्षमीकरण) यासारख्या क्षेत्रात स्वच्छ भारत मिशनला चालना मिळेल, या प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहेत. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची अखेरची तारीख २९ जानेवारी २०२३ असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता भारत तोरणे यांनी सांगितले की, या स्वच्छता स्पर्धेत सहभाग घेण्यास इच्छुक व्यक्ती / गट यांनी https://www.unitedwaymumbai.org/bmcswachhsurvekshan23 या लिंकचा वापर करुन अर्ज व माहिती भरावयाची आहे. ही स्वच्छता स्पर्धा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘युनायटेड वे मुंबई’ या संस्थेची नियुक्ती केली आहे. इच्छुक स्पर्धक २९ जानेवारी २०२३पर्यंत https://www.unitedwaymumbai.org/bmcswachhsurvekshan23 या लिंकवर संपूर्ण तपशील भरू शकतात. अपूर्ण अर्ज असलेल्या स्पर्धकांना माहिती न देता त्यांचे अर्ज फेटाळले जातील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

स्पर्धेच्या प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मुंबई महापालिकेतर्फे गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत एकूण ८ प्रमुख गट असून त्यामध्ये ५०पेक्षा अधिक व्यक्तिंना बसण्याची क्षमता असलेल्या हॉटेल्स, पालिका शाळा, खासगी शाळा, पालिका रुग्णालये, खासगी रुग्णालये, १ ते १०० सदनिका असलेले निवासी संकुल, १०१ ते ५०० सदनिका असलेले निवासी संकुल, शासकीय व निमशासकीय कार्यालय, मंडई, कचरा वर्गीकरण – कंम्पोस्टींग – घनकचरा व्यवस्थापन इत्यादीबाबत जिंगल, चित्रफित, पोस्टर, पथनाट्य यासारख्या विविध विषयांचा स्पर्धेसाठी विचार करण्यात येणार आहे. 

..

या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी तसेच सहभागी होण्यासाठी ग्रँटरोड पश्चिम परिसरातील खटाव मार्केट येथे ५व्या मजल्यावर असणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या कार्यकारी अभियंता (स्वच्छ भारत अभियान) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालय संपर्क क्रमांक ०२२-२३८५-०५७२ असा आहे.    

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content