Homeकल्चर +अदिती जोशी यांच्या...

अदिती जोशी यांच्या शास्त्रीय संगीताचा आनंद लुटा येत्या रविवारी!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘पं. भातखंडे संगीत सभा’ अंतर्गत येत्या रविवारी, २२ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता अदिती जोशी यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तबल्याची साथ मंदार पुराणिक आणि संवादिनीची साथ ज्ञानेश्वर सोनवणे करतील. हा कार्यक्रम य. वि. भातखंडे यांनी पुरस्कृत केला आहे.

अदिती जोशी यांची गायकी ग्वाल्हेर घराण्याची असून त्यांना पं. यशवंतबुवा जोशी, विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांचे मार्गदर्शन मिळाले असून सध्या त्या अपूर्वा गोखले यांच्याकडून तालीम घेत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकार परिक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. त्यांना ‘सूरमणी’ हा किताब प्राप्त झाला आहे. अनेक संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content