Homeमुंबई स्पेशलडीआरआयची धाडः मुंबई...

डीआरआयची धाडः मुंबई विमानतळावर ८ किलो सोने जप्त!

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने, काल, १७ जानेवारीला दुबईहून मुंबईला येणारा प्रवाशांचा गट, भारतात पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवली होती. या संशयित प्रवाशांची ओळख पटली आणि पथकाने त्यांना विमानतळावर अडवले. प्रवाशांची कसून तपासणी केल्यावर त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपातील ८ किलो २३० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. या सोन्याची किंमत अंदाजे साडेचार कोटी रुपये इतकी आहे.

जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने प्रवाशांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते.  त्यामुळे ते शोधणे अत्यंत कठीण होते. देशात विविध स्वरुपात सोन्याची तस्करी करणाऱ्यांना आळा घालण्याच्या आव्हानात्मक कामगिरीसाठी डीआरआयचे अधिकारी अवलंबत असलेली अनोखी कार्यपद्धती यामधून सूचित होते. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. देशात अवैध मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण साखळी उलगडून काढण्याच्या दृष्टीने, या प्रकरणाचा पुढील तपास प्रगतीपथावर आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content