Homeमुंबई स्पेशलरूपा पालेकर यांच्या...

रूपा पालेकर यांच्या निसर्गचित्रांचे आजपासून प्रदर्शन

कर्करोगाशी झुंज देतानाच शाळेत विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका रूपा पालेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन आजपासून मुंबईच्या वर्सोवा येथील वर्सोवा वेल्फेअर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात सुरू होत आहे.

वर्सोवा एज्युकेशन ट्रस्ट तसेच जनता कल्याण केंद्र यांनी संयुक्तपणे या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात रूपा पालेकर यांनी काढलेल्या शंभराहून जास्त निसर्गचित्रांचा समावेश आहे. आज आणि उद्या सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत ते सर्वांसाठी खुले राहील. या काळात येथे चित्रांची विक्रीही केली जाईल. यातून मिळणारे उत्पन्न रूपा पालेकर यांना त्यांच्या कर्करोगाबरोबरच्या लढ्यासाठी देण्यात येईल.

मुंबईचे माजी उपमहापौर आणि वर्सेवा एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त अरुण देव, कॅमलिन लिमिटेडचे अध्यक्ष श्रीराम दांडेकर, प्रसिद्ध लेखिका आणि कला समीक्षक साधना बहुलकर, क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट के. व्ही. गणपती, वर्सोवा एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त क्षितिज मेहता, राजन चांडोक आदी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content