Homeकल्चर +नववर्षदिनी शेकडो लोकांनी...

नववर्षदिनी शेकडो लोकांनी दुर्बिणीतून लुटला ग्रहदर्शनाचा आनंद

संध्याकाळच्या आकाशामध्ये सध्या शुक्र, शनि, गुरू आणि मंगळ हे मुख्य ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसत आहेत. या ग्रहांची शास्त्रीय माहिती तसेच या ग्रहांचे दुर्बिणीतून निरीक्षण करायला मिळावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. खगोल मंडळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क येथील सावरकर स्मारकाच्या प्रांगणात रविवार, दि. १ जानेवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी दुर्बिणीतून आकाशनिरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.

शनि ग्रहाची वलये तसेच गुरुग्रहाचे चार प्रमुख चंद्र तसेच चंद्रावर दिसणाऱ्या विवरांचे उपस्थित लोकांना दुर्बिणीतून निरीक्षण घडवले. या निमित्ताने खगोलशास्त्राशी संबंधित अनेक शंका व प्रश्न यांचे समाधान खगोल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले. आकाशातील काही निवडक तारकासमूह तसेच ध्रुव तारा ओळखण्याची पद्धत यावेळी सांगण्यात आली.

यावेळी खगोल मंडळाचे १० कार्यकर्ते कार्यरत होते. तसेच त्यांनी त्यांच्या दुर्बिणींच्या सहाय्याने हा आगळा आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम यशस्वी केला. उपस्थित अशा सुमारे ५०० प्रेक्षकांमध्ये केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा बहुभाषिक अनेक प्रेक्षकांचे शंकासमाधान करण्याचा प्रयत्न खगोल मंडळाने केला. खगोलशास्त्राच्या प्रसार आणि प्रचारासाठी तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, यासाठी अशाप्रकारचे अनेक उपक्रम खगोल मंडळ तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने यापुढे सुरू राहतील.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content