Homeकल्चर +उद्या माघी श्री...

उद्या माघी श्री गणेश जयंती!

माघ महिन्यातली श्री गणेश जयंती उद्या म्हणजेच सोमवार दि. १५ फेब्रुवारीला सर्वत्र साजरी होत आहे. त्यानिमित्त थोडेसे..

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते.

महत्त्व: गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात; म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशतत्त्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते. या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्त लाभ होतो.

गणेशजयंतीला गणेशतत्त्वाचा लाभ होण्यासाठी करावयाची उपासना: या दिवशी गणपतीचा भावपूर्ण नामजप ३ ते ९ माळा करण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्ती आणि चैतन्य यांचा अधिक लाभ होतो. गणपति अथर्वशीर्ष म्हटल्यासही लाभ होतो.

शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात?: गणपती हा दिशांचा अधिपती आहे. गणेशपूजन केल्यामुळे दिशा मोकळया करतो. त्यामुळे ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती पूजास्थानी येऊ शकते. गणपती (नाद) भाषेचे देवांच्या (प्रकाश) भाषेत रूपांतर करतो, त्यामुळे मनुष्याच्या प्रार्थना देवतांना कळतात. गणपती हा विघ्नहर्ता आहे.

गणपतीचे वाहन: वृ-वह म्हणजे वहाणे यापासून वाहन हा शब्द बनला आहे. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या-त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन. पण त्याची इतरही वाहने आहेत. उदा. युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्‍वराचे वाहन मोर आहे.

श्री गणेशाची उपासना म्हणून प्रतिदिन खालील गोष्टी कराव्यात: 

1. अथर्वशीर्षाचे पठण: आपल्या वाणीत चैतन्य असले की, आपल्या बोलण्यात गोडवा येतो. अथर्वशीर्षाच्या पठणाने आपले उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीत गोडवा येतो. यासाठी अथर्वशीर्षाचे पठण करावे.

2. अधिकाधिक प्रार्थना: आपण ज्या भाषेत बोलतो, तिला नादभाषा म्हणतात. इतर देवतांपेक्षा श्री गणपतीला आपली भाषा अधिक कळते; म्हणून अधिकाधिक प्रार्थना करून त्याची कृपा संपादन करावी.

3. मानसपूजा: मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा. मानसपूजेमुळे मनाला उत्साह मिळतो. याला कोणतेच बंधन नसते. आपल्याला या पूजेद्वारे आपल्या आवडीची वस्त्रे, आवडीची वस्तू देता येते. आपण मनाने सतत श्री गणपतीच्या सहवासात राहून आनंदी राहू शकतो.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्री गणपति’

संपर्क क्र. 9920015949

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content