Homeकल्चर +‘छपाई ते लेखणी’चे...

‘छपाई ते लेखणी’चे शानदार प्रकाशन!

मराठे उद्योग समुहातील तिसऱ्या पिढीचे उद्योजक यशवंत मराठे यांनी लिहिलेले ‘छपाई ते लेखणी’ हे पुस्तक म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने वाचकांशी सुसंवाद साधणारे आहे. लेखनशैली अत्यंत पारदर्शक आहे. लेखक आपल्याशी गप्पा मारतोय असे वाटते. तसेच काही महत्त्वाच्या विषयांना हात घालण्याचे धाडस दिसून येते. असेच लिखाण वाचकांना भावते, असे विचार सुप्रसिद्ध लेखक आणि उद्योजक जयराज साळगावकर यांनी व्यक्त केले.

उद्योजक यशवंत मराठे यांनी व्यावसायिक कार्य सांभाळत आपल्यातील साहित्यिक गुणांना वाव देत `सरमिसळ’ नावाचे स्फूटलेखन केले. यात इतिहास, संस्कृती, चालू घडामोडी, तत्त्वज्ञान, आठवणी, व्यक्तिचित्रणे, प्रवास वर्णने, बालपणाच्या आठवणी अशा अनेकविध विषयांना समाविष्ट केले आहे. त्याच्या एकत्रित संकलनातून `छपाई ते लेखणी’ हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केले असून त्याचे शानदार प्रकाशन प्रभादेवी येथील मराठे उद्योग भवनात जयराज साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

`छपाई ते लेखणी’ ही साहित्यकृती नव-सृजन या निकषात बसणारी आहे. व्यक्तिचित्रणे हा या पुस्तकातील एक अत्यंत तरल आणि मनोज्ञ असा भाग आहे. प्रत्येक लेख हा वास्तववादी आणि अभ्यासपूर्ण असून लेखकाची चिकित्सक वृत्ती त्यातून दिसून येते, असे विचार सुधीर जोगळेकर यांनी व्यक्त केले.

उद्योगपती ते सामाजिक कार्य ते आता हौशी लेखक असा हा प्रवास आहे. सच्चेपणाने लिहिणे हे माझे ब्रीदवाक्य आहे. मनातील विचार कागदावर उतरवून मन हलके करत असतानाच ते कधी साहित्यात आणि पुस्तकरुपाने परावर्तित झाले, हे समजलेच नाही. त्यामुळे हे सारे काही नकळत आणि उत्सफूर्तपणे होत गेले, असे विचार लेखक यशवंत मराठे यांनी व्यक्त केले.

उत्तम साहित्यकृती प्रकाशित करणे हे ग्रंथालीचे वैशिष्ट्य असून यशस्वी उद्योजकाचे चौफेर लेखन असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल. हे साहित्य वाचकांपुढे सादर करून एक उत्तम साहित्यकृती वाचल्याचा अनुभव त्यांना नक्कीच येईल, असा विश्वास ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूर यांनी व्यक्त केला.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content