Homeमुंबई स्पेशलनववर्षाच्या स्वागतासाठी श्री...

नववर्षाच्या स्वागतासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर सज्ज!

येत्या एक जानेवारीला नववर्ष साजरे करण्यासाठी भक्तांच्या सोयीसाठी मुंबईतल्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने मंदिराच्या श्री दर्शन तसेच इतर कार्यक्रमांची विशेष आखणी केली आहे.

यानुसार, पहाटे सव्वातीन ते सव्वापाचपर्यंत श्रींचे दर्शन भाविकांसाठी उपलब्ध राहील. साडेपाच वाजता श्री गणरायाची आरती सुरू होईल. सहा वाजता श्रींच्या दर्शन पुन्हा सुरू होईल. सकाळी 11 वाजून 55 मिनिटांपर्यंत हे दर्शन सुरू राहील. दुपारी 12 वाजून 05 मिनिटांनी श्रींचा नैवेद्य ठेवला जाईल. साडेबारा वाजता श्रींच्या दर्शनाला पुन्हा सुरुवात होईल. हे दर्शन संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालेल.

सायंकाळी सात वाजता धुपारती सुरू होईल. ती सात वाजून दहा मिनिटापर्यंत चालेल. साडेसात वाजता श्रींची आरती सुरू होईल. ती आठ वाजेपर्यंत चालेल. रात्री आठ ते साडेअकरा वाजेपर्यंत पुन्हा श्रींचे दर्शन भाविकांना घेता येईल. अकरा वाजून पन्नास मिनिटांना शेजारती सुरू होईल. त्यानंतर मंदिर बंद होईल, असे न्यासाने स्पष्ट केले आहे.

श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पूर्वीप्रमाणे म्हणजेच क्यू आर कोडशिवाय श्रींचे दर्शन घेता येईल. रात्री साडेअकरा वाजता दोन्ही चेक पोस्ट दर मंगळवारप्रमाणे बंद करण्यात येतील. या दिवशी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे रांगेची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे, तरी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने केले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content