Homeकल्चर +पं. हरिप्रसाद चौरसिया...

पं. हरिप्रसाद चौरसिया यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मोहम्मद रफी यांचा आवाज म्हणजे ईश्वरी जादू होती. त्यांनी आपल्या आवाजाने भजनेही अजरामर केली. ज्यांना संगीताची कदर असते त्यांच्यासोबत ईश्वर असतो, असे गौरवोद्गार पं. हरिप्रसाद चौरसिया काढले.

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा करताना आपल्या बासरीच्या सुरांनी वेड लावणारे ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार 2022 तर सुप्रसिध्‍द गायिका दिलराज कौर यांना सन 2022चा मोहम्‍मद रफी पुरस्‍कार डिस्ने हॉट स्टारचे भारतातील अध्यक्ष के. माधवन् यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार आशिष शेलार, प्रतिमा शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी संगीत क्षेत्रातील एका ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष असून एक लाख रू. धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. मोहम्मद रफी यांचे कुटुंबीय आमदार शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा सभागृहात पार पडतो.

यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे “फिर रफी” या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण यांनी मोहम्मद रफी यांची अजरामर गाणी सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ यांनी केले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content