Homeमुंबई स्पेशलकिशोरीताईंनी एसआरएमधले ढापलेले...

किशोरीताईंनी एसआरएमधले ढापलेले फ्लॅट जप्त!

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळीत एसआरएतील लाभधारकांकडून हडपलेले दोन फ्लॅट त्यांच्याकडून काढून घेण्यात अखेर भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांना यश आले. राज्य सरकारच्या एसआरए तसेच मुंबई महापालिकेने आज त्यांना पाठवलेल्या जप्तीच्या नोटिसीची अंमलबजावणी करत हे दोन्ही फ्लॅट ताब्यात घेतले.

१० वर्षांपूर्वी त्यांनी हे फ्लॅट घेतले होते. त्यातल्या एका फ्लॅटचा वापर त्यांच्याकडून त्यांच्या किश कंपनीच्या कार्यालयासाठी वापर केला जात होता. किशोरी पेडणेकर यांनी आपल्या निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र देताना आपल्या घराचा पत्ता गोमाता जनता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बिल्डिंग नंबर दोनमधल्या फ्लॅटचा दिला होता. हा फ्लॅट गंगाराम बोगा यांना एसआरए योजनेत मिळाला होता. २००८ साली त्यांना याचा ताब्यात देण्यात आला. तेव्हापासून हा फ्लॅट किशोरीताईंच्या ताब्यातच होता.

एसआरएने याबाबत केलेल्या तपासात तसेच मुंबई महापालिकेने केलेल्या चौकशीत एसआरएच्या या फ्लॅटमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घुसखोरी केल्याचे आढळून आले आहे. घुसखोरी हा शब्द चौकशी अहवालातच वापरलेला आहे. तसाच प्रकार त्यांच्या किश कॉर्पोरेट सर्विसेस प्रा. लि. कंपनीला मिळालेल्या फ्लॅटबाबतही घडला आहे. हासुद्धा संजय अंधारी यांना एसआरएमधून मिळालेला फ्लॅट आहे. हे दोन्ही फ्लॅट येत्या ४८ तासांत रिकामे करून एसआरएला त्याचा ताबा द्यावा, नाही तर एसआरए स्वतः त्याचा ताबा घेईल आणि यासाठी लागणारा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाईल, असे आदेश एसआरएने जारी केले होते, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content