Homeमुंबई स्पेशलसीमावादाच्या गदारोळात कर्नाटकाच्या...

सीमावादाच्या गदारोळात कर्नाटकाच्या मैसूरचे महापौर मुंबईत!

एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद नव्याने उफाळला असतानाच कर्नाटक राज्यातील मैसूर शहराचे महापौर शिवकुमार व उपमहापौर डॉ. रूपा यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली.

मैसूरचे महापौर शिवकुमार व उपमहापौर डॉ. रूपा यांना पुष्पगुच्छ, महापालिका बोधचिन्ह व वार्षिक प्रकाशनाची प्रदान करून सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी स्वागत केले. सहआयुक्त सावंत यांनी प्रास्ताविकातून पालिकेची रचना, कार्यपद्धती व कामकाजाची सविस्तर माहिती पाहुण्यांना दिली. त्याचप्रमाणे त्यांनी पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई सागरी किनारा रस्ता तसेच इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांचीदेखील सविस्तर माहिती दिली. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग व रस्ते विभागाचे सविस्तर सादरीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी केले.

प्रारंभी, पालिका मुख्यालय इमारतीची हेरिटेज वॉकद्वारे कार्यकारी अभियंता (वारसा जतन समिती) संजय सावंत यांनी माहिती दिली. मैसूरचे महापौर शिवकुमार यांनी पालिकेच्या रस्ते विभागाचे कौतुक केले. प्रचंड वाहतुकीचा भार असलेल्या मुंबईत ज्याप्रकारे रस्त्यांची बांधणी आणि देखभालीसाठी पालिका तंत्रज्ञान वापरते, त्याबाबत आमच्या अभियंत्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण द्यावे, अशी विनंतीदेखील त्यांनी केली.

पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. सहआयुक्त मिलिन सावंत यांनी या मागणीला सहमती दर्शविली. त्यानंतर मान्यवरांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची शनिवारी पाहणी केली.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content