Homeमुंबई स्पेशल'लालबागचा राजा'चा प्रसाद...

‘लालबागचा राजा’चा प्रसाद आता पेटीएमवरून करा ऑर्डर!

भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी, तसेच क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी कंपनी ब्रॅण्ड पेटीएमला दोन वर्षांच्या अंतरानंतर परतत असलेला मुंबईचा सर्वात लोकप्रिय, ‘लालबागचा राजा’ उत्सवासाठी विशेष अधिकार देण्यात आले आहेत. कंपनी आपल्या अॅपवर बाप्पाचे लाइव्ह दर्शन प्रसारित करणारे एकमेव व्यासपीठ असेल. तसेच बाप्पाचा प्रसाद आणि मंडळाला दान देण्याची सुविधाही एका क्लिकवर यामध्ये उपलब्ध असेल.

पेटीएम सुपर अॅपसह देशातून कुठूनही ड्रायफ्रूट प्रसाद ऑर्डर करता येऊ शकतो आणि हा प्रसाद २ ते ५ दिवसांमध्ये डिलिव्हर करण्यात येईल. हा प्रसाद २५० ग्रॅमसाठी ४०० रूपये स्वरूपात ऑर्डर करता येऊ शकातो. ऑर्डर करण्यासाठी पेटीएम अॅप होम पेजवरील गणेश उत्सव आयकॉनवर क्लिक करावे.

कंपनीने मंडळाला भेट देणाऱ्या नवीन वापरकर्त्यांसाठी आकर्षक ऑफर्स लॉन्च केल्या आहेत. पेटीएम अॅप डाऊनलोड केल्यानंतर नवीन वापरकर्ते लालबागचा राजा मंडळामध्ये असलेले क्यूआर कोड स्कॅन करत ५१ रूपये दान करू शकतात, तसेच त्यांना याच रक्कमेच्या कॅशबॅकसोबत प्रसादाचे लाडू मिळतील. मंडळाला भेट देऊ न शकणारे नवीन वापरकर्ते ऑनलाईन प्रसाद ऑर्डर करू शकतात आणि त्यांनादेखील ५१ रूपयांची कॅशबॅक मिळेल. पेटीएम अॅपवर दिवसातील सर्वोच्‍च दान करणाऱ्या वापरकर्त्याला स्पेशल व्हीआयपी दर्शनासाठी ‘कपल एण्ट्री’ पास मिळतील.

यासंदर्भात पेटीएम प्रवक्ता म्हणाले की, क्यूआर व डिजिटल पेमेंट्सचे अग्रगण्य म्हणून आम्ही महाराष्ट्रात आर्थिक समावेशनाला चालना देण्याप्रती कटिबद्ध आहोत. लालबागचा राजा उत्सव कमिटीसोबतच्या आमच्या सहयोगाचा महाराष्ट्रातील लोकांसोबत सखोल सहभाग निर्माण करण्याचा आणि सणासुदीचा काळ व आगामी नववर्षासाठी नवीन शुभारंभांची सुरूवात करण्याचा मनसुबा आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी म्हणाले की, दोन वर्षांनंतर गणेशभक्त मंडळाला भेट देऊ शकतील आणि आम्हाला १.२ कोटींहून अधिक गणेशभक्त भेट देण्याची अपेक्षा आहे. अधिकाधिक गणेशभक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी पेटीएम अॅपच्या माध्यमातून लाइव्ह दर्शन मोठे वरदान ठरेल. देशभरातील गणेशभक्त अॅपवर दान करू शकतात आणि हे दान सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात येईल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content