Homeमुंबई स्पेशलओसंडून वाहू लागला...

ओसंडून वाहू लागला मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधला मोडक सागर, हा तलाव आज दुथडी भरून वाहू लागला. पाणीपुरवठा करणारा भरुन वाहणारा हा पहिला तलाव आहे.

मुंबई महापालिकेकडून दररोज ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक सागर तलाव आज दुपारी ०१.०४ वाजता ओसंडून वाहू लागला. यंदाच्या पावसाळ्यात ओसंडून वाहणारा हा पहिलाच तलाव ठरला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालि

मोडक सागर तलाव गेल्यावर्षी म्हणजेच २०२१मध्ये २२ जुलै २०२१ रोजी मध्यरात्रीनंतर ०३.२४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्यापूर्वी म्हणजेच २०२०मध्ये १८ ऑगस्टला रात्री ०९.२४ वाजता, २०१९ मध्ये २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. या सर्व आधीच्या वर्षांच्या तारखा लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात हा तलाव काही दिवस आधीच पूर्ण भरुन वाहू लागला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार ८११५२.२० कोटी लीटर (८,११,५२२ दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ५६.०७ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ४३.७२ टक्के अर्थात ९९२६.८० कोटी लीटर (९९,२६८ दशलक्ष लीटर), तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ६६.७९ टक्के अर्थात ९६८९.४० कोटी लीटर (९६,८९४ दशलक्ष लीटर), ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या ५३.९० टक्के अर्थात १०४३२.२० कोटी लीटर (१,०४,३२२ दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ५१.०६ टक्के अर्थात ३६६११.३० कोटी लीटर (३,६६,११३ दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ५३.१८ टक्के अर्थात १४७३ कोटी लीटर (१४,७३० दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्येदेखील पाणी साठवणक्षमतेच्या ७६.०८ टक्के अर्थात ६१२.१० कोटी लीटर (६,१२१ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content