Homeकल्चर +रसिकांसाठी संगीत सौभद्र,...

रसिकांसाठी संगीत सौभद्र, संगीत ताजमहाल, संगीत धाडिला राम… ची पर्वणी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे २९ एप्रिल ते १ मे, असा तीन दिवसांचा संगीत नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. ही सर्व नाटके संस्थेच्या पहिल्या मजल्यावरील वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात दररोज सायंकाळी ५.३० वाजता होतील. हा महोत्सव विमल ट्रस्ट व दिलीप काटदरे यांच्या सहयोगाने साजरा होत आहे.

शुक्रवार, दि. २९ एप्रिल रोजी रत्नागिरीच्या ‘खल्वायन’ निर्मित पं. विद्याधर ओक लिखित आणि मनोहर जोशी दिग्दर्शित ‘संगीत ताजमहाल’ ही नाटके होणार आहेत. या नाटकाला महाराष्ट्र राज्य संगीत नाट्यस्पर्धेत वर्ष २०२०चा प्रथम पुरस्कार आणि वैयक्तिक दहा पुरस्कार लाभले आहेत.

शनिवार, दि. ३० एप्रिल रोजी ‘गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट, पुणे’ निर्मित आणि अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित ‘संगीत सौभद्र’ हे नाटक होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन दीप्ती भोगले यांचे असून संगीत मार्गदर्शन कीर्ती शिलेदार यांचे आहे.

संगीत

रविवार, दि. १ मे रोजी साहित्य संघ निर्मित आणि पं. अरविंद पिळगावकर दिग्दर्शित ‘संगीत धाडिला राम तिने का वनी..’ हे नाटक सादर होणार आहे. भास यांनी लिहिलेल्या मूळ संस्कृत नाटकाचा स्वैर अनुवाद द. ग. गोडसे यांनी केला आहे. या नाटकाला २०२२ सालच्या राज्य नाट्य स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले असून अभिनय व गायनाची पाच पारितोषिके मिळाली आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क:०२२-२४३०४१५०

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content