Homeकल्चर +अल्लड वयातल्या, शाळेतल्या 'ती'ची...

अल्लड वयातल्या, शाळेतल्या ‘ती’ची गोष्ट!

शाळेतल्या ‘त्या’ वयात आपल्या प्रत्येकालाच कोणी ना कोणी ‘ती’ किंवा ‘तो’ नक्कीच आवडत असतो. अजाण वयातल्या त्या भावना प्रत्येकासाठीच कायमच विशेष राहिलेल्या असतात. हाच धागा पकडत ‘ती आणि शाळा’ या नव्या वेब सिरीजची घोषणा स्टुडिओ ०९ प्रॉडक्शनने नुकतीच सोशल मीडियावर केली आहे.

वेब सिरीजच्या शीर्षकावरूनच ही वेब सिरीज शाळेतल्या तिच्याभोवती फिरणारी असल्याचं समजते. शाळेतल्या आठवणींना उजाळा देतानाच त्या अजाण वयात भेटलेल्या ‘ती’ भोवतीची ही कहाणी आहे. पुढे शाळा संपल्यानंतरही त्याच्या आयुष्यात कुठे ना कुठे ‘ती’ कायम आहेच. शाळा संपल्यानंतर ‘ती’ त्याच्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणते यावर भाष्य करणारी ही प्रेमळ वेब सिरीज लवकरच युट्युबच्या माध्यमातून स्टुडिओ ०९ या चॅनलवर लॉन्च होणार आहे.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या साताऱ्यात वेब सिरीजच्या चित्रिकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या वेब सिरीज बद्दल दिग्दर्शक आशिष पुजारी सांगतात की, शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच खास राहिलेला विषय आहे. शाळा आपल्याला घडवते, शिकवते. अगदी त्याचप्रमाणे निरागस, निष्पाप वयात भेटलेली ‘ती’देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी नकळत सांगते, शिकवते. त्यामुळे ही वेब सिरीज म्हणजे ती शाळा तसंच ‘ती आणि शाळा’ अशा दोन्ही अर्थाची आहे.

अल्पावधीतच या वेब सिरीजचा आशय आणि विषयाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. याबाबत अधिक बोलताना स्टुडिओ ०९ प्रोडक्शनचे निर्माते धनेश रामचंद्र पाटील सांगतात की, प्रत्येकाच्याच आयुष्यात घडणाऱ्या शाळेतल्या त्या अजाण वयातल्या जादुई प्रेमाची ही गोष्ट लवकरच प्रेक्षकांना स्टुडिओ ०९ प्रॉडक्शनच्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. यात असलेले सर्वच कलाकार आणि पडद्यामागे असलेली टीम सक्षम असल्याने एक उत्तम कलाकृती प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल अशी आशा आम्हाला वाटते.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content