भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या चेंबूर एम / पश्चिम विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कालपासून सजविण्यात आले आहे.

उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने अनुयायी येतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सदर उद्यानात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून उद्यानात विविध प्रकारची रंगबेरंगी आकर्षक फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. शोभिवंत पानांच्या तसेच फुलांच्या कुंड्यांची आकर्षक मांडणीही करण्यात आली आहे.
या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरते शौचालय, साफसफाई इ. व्यवस्था करण्यात आली आहे.

