Homeटॉप स्टोरीआता तरी.. अजितदादांचे...

आता तरी.. अजितदादांचे मुख्यमंत्र्यांना साकडे!

राज्यातल्या अनेक महामंडळावरील नियुक्त्या बाकी आहेत. महिलांशी निगडीत असलेल्या महामंडळावर नियुक्ती जाहीर केलेली आहे. आता इतर महामंडळांच्या नियुक्त्या फार काळ प्रलंबित न ठेवता त्या जाहीर करुन टाकाव्यात, अशी जाहीर मागणी उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी केली. हे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत त्यांनी या भावना काँग्रेसच्या श्रेष्ठींना तसेच मुख्यमंत्र्यांना कळवल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. नवीन वर्षात अधिवेशन सुरू होते, तेव्हा राज्यपालांचे अभिभाषण असते. त्यासाठी मोठ्या सभागृहाची गरज असते. तसेच कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा सरकारचा विचार आहे. विदर्भात अधिवेशन घ्यायलाच पाहिजे, या मताशी सरकारदेखील सहमत आहे. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांत विदर्भात अधिवेशन घेणे शक्य झाले नसले तरी पुढच्या काळात विदर्भात अधिवेशन होईल, अशी माहितीही पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात कोरोना महामारी नियंत्रणात आणण्याचे उत्कृष्ट काम झाले. त्या कामाचे कौतुक माध्यमे, न्यायालय आणि विविध संस्थांनीदेखील केलेले आहे. धारावीसारख्या भागात कोरोना नियंत्रणात आणण्याचे आव्हानात्मक काम झाले. वेळप्रसंगी धीर देऊन आणि कडक निर्बंध लावून नियंत्रण लावण्याचे काम केले. पण कधीकधी राजकीय भूमिकेतून कुणी टीका करतात. लोकशाही असल्यामुळे हा ज्याचात्याचा अधिकार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

अजित

आमच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत याची सविस्तर माहिती दिली आहे. सर्वाधिक रेल्वे गुजरातमधून सुटल्या, इतर राज्यातून किती सुटल्या याची सर्व माहिती समोर आहे. केंद्रानेच मजुरांसाठी रेल्वे पुरविल्या, मोफत धान्य दिले. त्याकाळात मजुरांनाच थांबायचे नव्हते. त्यामुळे मजुरांना मदत करण्यासाठी आपण अन्नछत्र चालविले, त्यांना एसटी बसेसची सुविधा दिली. लॉकडाऊनमध्ये मजूर उपाशीपोटी रस्त्याने चालत निघाले होते. त्यात गरोदर महिला होत्या. वृद्ध आणि लहान मुलेही होती. माणुसकीच्या नात्याने महाराष्ट्राने त्यांना मदत केली असेही त्यांनी सांगितले.

जेव्हा जेव्हा देश आणि राज्यावर संकट येते, तेव्हा राजकीय जोडे बाजूला ठेवून शरद पवार काम करत असतात. त्यामुळेच कदाचित पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले, असेही ते म्हणाले.

कोणत्याही देशात, राज्यात, शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत, ते अबाधित ठेवण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे असे सांगतानाच हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी असल्याचे मतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

गंगापूरचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीत

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरमधील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी पाच नगरसेवकांसह, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content