Homeकल्चर +रविवारी पहाटे 'ब्रह्मनाद'...

रविवारी पहाटे ‘ब्रह्मनाद’ या संगीत मैफिलीचे आयोजन!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या वतीने येत्या रविवारी, 13 फेब्रुवारीला पहाटे 6.30 वाजता ‘ब्रह्मनाद’, या संगीत पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरातच हा कार्यक्रम होणार आहे. नागपूरच्या प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका डॉ. साधना शिलेदार यावेळी शास्त्रीय गायन सादर करतील. कला रसिकांना कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. त्याचप्रमाणे https://www.facebook.com/SCZCC/ या फेसबुक दुव्याच्या माध्यमातूनही रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.

डॉ. साधना शिलेदार यांनी त्यांचे वडील डॉ. विवेक गोखले, पंडित मनोहरराव कासलीकर, पंडित चंद्रशेखर रेळे आणि आरती अंकलीकर-टीकेकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. डॉ. साधना शिलेदार या आकाशवाणीच्या ब श्रेणी शास्त्रीय संगीत कलाकार आहेत.

डॉ. साधना शिलेदार यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी विविध समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय गायन सादर केले आहे. ‘ब्रह्मनाद’ या पहाट संगीत मैफलीत त्यांना राम ढोक तबला तर श्रीकांत पिसे हार्मोनियमची साथसंगत करतील.

या कार्यक्रमासाठी  प्रति व्यक्ती 50 रुपये देणगी शुल्क ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमस्थळी उपलब्ध असतील. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक कला रसिकाने मास्क परिधान करून कार्यक्रमस्थळी प्रवेश करणे अनिवार्य आहे. यादृष्टीने सहकार्य करून रसिकांनी या पहाट मैफलीचा आनंद घ्यावा, असे  आवाहन  दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content