Homeमुंबई स्पेशलकॉर्डेलिया क्रूझवरील १३९...

कॉर्डेलिया क्रूझवरील १३९ प्रवासी कोविडबाधित!

कॉर्डेलिया क्रूझवरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांपैकी एकूण १३९ जण कोविडबाधित असल्याचे अहवाल काल रात्री (५ जानेवारी २०२२) मुंबई महापालिकेला प्राप्त झाले आहेत.

कॉर्डेलिया क्रूझ मंगळवारी सायंकाळी ग्रीन गेट येथे आल्यानंतर त्यावरील ६० बाधित रुग्णांना भायखळा येथील रिचर्डसन  आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्र, सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालय आणि इतर विविध हॉटेल्समध्ये यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे.

त्यानंतर, जहाजावरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांची कोविड तपासणी करून, त्यांच्या स्वॅबचे नमुने दोन वैद्यकीय प्रयोगशाळेमार्फत घेण्यात आले होते. यासाठी महानगरपालिकेच्या ए विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी व त्यांचे सहकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ तसेच परिरक्षण खात्यातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार अशी संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. प्रवाशांची तपासणी करण्याची कार्यवाही पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त (परिमंडळ १) रणजित ढाकणे, ए विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) शिवदास गुरव व त्यांचे सहकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता आंबेरकर यांनी आवश्यक ते सर्व नियोजन व व्यवस्था केली होती.

बाधित रुग्णांच्या वाहतुकीसाठी १७ आसनी क्षमतेच्या पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. ज्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, अशा सर्व रुग्णांना सात दिवस गृह अलगीकरण सक्तीचे केले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content