Homeटॉप स्टोरीकोरोना प्रतिबंधासाठी केंद्राने...

कोरोना प्रतिबंधासाठी केंद्राने दिलेला पैसा किती वापरला?

कोरोनाला रोखण्याबाबत आवश्यक असलेली महाराष्ट्रातली कामे संथ गतीने सुरू असून त्याची गती वाढवणे गरजेचे आहे असे सांगत केंद्राने दिलेल्या राष्ट्रीय आरोग्य निधीपैकी किती खर्च झाला याची माहिती राज्य सरकारकडून दिली जावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज एका पत्रकार परषदेत केली.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज मुंबई आणि राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉन याबाबत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांतील रुग्ण्संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव सातत्याने सर्व राज्यातील आरोग्य सचिवांशी चर्चा करत आहेत आणि बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या असून चाचणी किट्स खरेदी करण्यासाठी राज्यांना निधी दिला आहे. याशिवाय केंद्राने लसींसह इतरही सर्व मागितलेली मदत दिलेली आहे. त्याचा सुयोग्य वापर आणि अंमलबजावणी करणे हे राज्याचे काम आहे, असे त्या म्हणाल्या.

मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे ही काळजीची गोष्ट असून हा व्हायरसविरोधातील लढा आहे हे लक्षात घेऊन सर्वांनी सतर्क राहायला हवे, मार्गदर्शक सूचनाचे पालन करायला हवे, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

राज्यात कोविडचे रुग्ण मागच्या काही आठवड्यात वाढत आहेत. त्याबरोबरच ओमायक्रॉनचे रुग्णदेखील वाढत आहेत. आताच काळजी घेतली तर आणखी होणारा प्रसार रोखता येईल. रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या-त्या राज्यांनी काय निर्णय घ्यावे यासंदर्भात तसेच  आयसीयु आणि अन्य बेडस यांची उपलब्धता याबाबत केंद्राने यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content