Homeटॉप स्टोरीएसटी कामगारांना ‘शासकीय...

एसटी कामगारांना ‘शासकीय सेवा’ नाहीच?

राज्यातल्या एसटी कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करता येणार नाही, असे आज काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचित केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्या एका उच्चस्तरीय अभ्यास समितीचा अहवाल सादर होण्यापूर्वीच सरकारमधल्या एका जबाबदार मंत्र्यांनी हे विधान केल्यामुळे एसटी कामगारांच्या विलिनीकरणावर सरकारने काय ठरवले आहे, हे स्पष्ट होते, असा सूर संपकरी एसटी कामगारांमध्ये उमटू लागला आहे.

एसटी कामगारांचे शासकीय सेवेत विलिनीकरण करावे या मागणीसाठी कामगार संपावर आहेत. एसटी कामगारांना सरकारी नोकरीत समाविष्ट करता येणार नाही, असे दिसते आहे. त्यासंबंधीची चौकशी करणारा अहवाल अजून यायचा आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय वगैरे अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे एसटी कामगारांनीही अधिक न ताणता संप मागे घ्यावा, असे आवाहन थोरात यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. मुख्यमंत्री आजारी असले तरी ते साऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. परिवहन मंत्री अनिल परब चांगल्या पद्धतीने संप हाताळत आहेत, असेही ते म्हणाले.

विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात विधानसभेला नवीन अध्यक्ष मिळेल. हे अध्यक्ष काँग्रेसचेच असतील. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल हे पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निश्चित केले जाईल, असेही थोरात यांनी सांगितले.

राज्यात सहकार हा विषय चांगल्या पद्धतीने राबविला जात आहे. राज्यात जी समृद्धी दिसत आहे त्यात सहकाराचाच वाटा मोठा आहे, असेही त्यांनी सांगितले.

अलिकडे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल संपलेले आहे. भाजपा कार्यकर्त्यांना सावरण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात भाजपाची अधोगती सुरू आहे. आमचे सरकार चांगले काम करत आहे. पुढील निवडणुकीतही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम आम्ही करणार आहोत, असेही थोरात यांनी सांगितले.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content