Homeमुंबई स्पेशलहेमंत सावंत यांची...

हेमंत सावंत यांची ‘टायगर सफारी’ आजपासून!

छायाचित्रकार हेमंत सावंत  यांच्या व्याघ्रजीवनशैलीवर आधारीत छायाचित्रांचं प्रदर्शन आजपासून म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून जहांगीर कलादालनात सुरू होत आहे. ते गेली अनेक वर्षं ‘जंगल टू जंगल’ असा प्रवास करीत आहेत.

कान्हा, बांधवगड, पन्हा, मेळघाट, ताडोबा, पेंच, रणथंबोर, जिम कॉर्बेट या जंगलात जाऊन त्यांनी  व्याघ्रजीवनशैलीचा अभ्यास करीत असताना कॅमेऱ्यात हे महत्त्वाचे क्षण टिपले आहेत. 

आनंदी व आळस देणारा वाघ, आक्रमक आणि चपळपणा असणारा वाघ, ऐटबाज चाल असणारा वाघ, मित्रांसोबत पाण्यातून धावत रममाण होणारा वाघ, आपल्या पिल्लांची काळजी घेणारी कुटुंबवत्सल वाघीण अशा अनेक गोष्टी त्यांनी कॅमेऱ्याने  टिपल्या आहेत. शिवाय त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास ५०

छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून या प्रदर्शनाचे उद्घाटन वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड असणारे व काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणिस मुकुल वासनिक यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता होणार आहे. फोटोग्राफी क्षेत्रातील जाणकार केकूभाई कोठारी तसेच महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री व फोटोग्राफी अभ्यासक सुरेश शेट्टी व शारी फोटोग्राफीचे संचालक गिरीश मिस्त्रीदेखील उपस्थित राहणार आहेत.

२३ ते २९ नोव्हेंबर २०२१, सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे. “व्याघ्रप्रदर्शनाचा आनंद लुटा” असे आवाहन हेमंत सावंत यांनी केले आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content