Homeमुंबई स्पेशलफडणवीसांचे आरोप नवाब...

फडणवीसांचे आरोप नवाब मलिकांना कुबूल..!

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोडलेले फटाके नवाब मलिक यांना भिजलेले वाटले. पण, त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, मेकअप उतरलेला होता. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद म्हणजे.. कुबूल.. कुबूल.. कुबूल.. असा कबुलीनामाच होता, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत हे फडणवीस यांनी उघड केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन पोलीसांमार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी एकूण चार आरोप केले. त्यापैकी पहिला सरदार शाहवल्ली हा मुंबईच्या 93च्या बाँम्बस्फोटमधील शिक्षापात्र आरोपी असून त्याच्याशी नवाब मलिक यांचे आर्थिक व्यवहार झाले. दुसरा, मोहमद सलीम पटेल हा दाऊदची बहिण हसीना पारकरचा ड्रायव्हर व फ्रंट मँन, पाँवर आँफ एटर्नी होल्डर आणि अटक झालेला आरोपी यांच्यामार्फत व्यवहार करुन फायदा करुन दिला. तिसरा आरोप.. मुंबई बाँम्बस्फोटातील आरोपीं, जे टाडाखाली अटक झाले त्या आरोपींची जी जमीन सील होणार होती, सरकारजमा होईल म्हणून त्यांना मदत करण्यासाठी त्यांची जमीन स्वतःकडे वळवली, घेतल्याचे दाखवले. आणि चौथा आरोप.. जमीन कवडीमोल किंमतीने घेऊन त्यांचा फायदा केला. यातील तीन आरोप नवाब मलिक यांनी कबूल केले. हसीना पारकर या विषयात बोलण्याची हिम्मत नसल्याने त्याबद्दल मौन राखून त्यांनी तो आरोप कबूल केला, असेही शेलार म्हणाले.

नवाब मलिक म्हणतात की, त्या जागेत आमची दुकाने होती. त्यासह संपूर्ण कंम्पाऊंडची मालकी मिळवली. तेही 30 लाख ठरवून.. 20 लाख एवढ्या कवडीमोल किमंतीत मालकी मिळवली. मुंबईतील हे कसले “नवाबी भाडेकरू”?, ज्यांना सरकारी दरापेक्षा कमी दरात जागेची मालकी मालकाने दिली. मुंबईतील भाडेकरुंचा प्रश्न एवढ्या सहजपणे सुटत असेल तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीआर काढून वर्षानुवर्षे न्यायालयात लढणाऱ्या मुंबईतील भाडेकरुंना हाच नियम लावावा, अशी उपरोधिक मागणीही त्यांनी केली. मुंबईतील खाजगी जागेवरील झोपडपट्टीची मालकी देण्यासाठी आजसुद्धा सरकार रेडीरेकनरच्या 25% रक्कम जमा करुन घेते. मग नवाब मलिक यांना एवढी जागा कशी काय हस्तांतरीत करुन मिळाली? या व्यवहारात सरदार शाहवल्ली याचे वडील वॉचमन असल्याने त्यांनी आपले नाव जागेला चढवले म्हणून त्याला पैसै दिले, हा नवा नवाबी धंदा सांगताय का? नवाबी दर, नवाबी धंदे, नवाबी व्यवहार, नवाबी भाडेकरू, नवाबी मालक असे बोलत शेलार यांनी मलिक यांच्या विधानांची खिल्ली उडवली.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content