Homeकल्चर +पुलंच्या साहित्याला दिलीप...

पुलंच्या साहित्याला दिलीप प्रभावळकर, अरूणा ढेरेंच्या आवाजाचा साज!

आज, 8 नोव्हेंबर 2021 रोजी, पु. ल. देशपांडे यांची 102वी जयंती आहे. त्यानिमित्त स्टोरीटेल मराठीवर पुलंच्या आगळ्यावेगळ्या पुस्तकांची भेट श्रोत्यांना मिळणार आहे. पुलंनी लिहिलेले वेगळ्या विषयांवरचे लेख, त्यांनी इतर कलावंत व साहित्यिकांना लेखनातून दिलेली दाद, काही हलकेफुलके व वैचारिक स्वरूपाचे लेखन यांचा यात समावेश आहे.

‘विश्रब्ध शारदा’सारख्या अनेक पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना ‘चार शब्द’ या त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या पुस्तकात समाविष्ट आहेत. याच पुस्तकातले ‘विश्रब्ध शारदा’ आणि ‘रंग माझा वेगळा’ हे दोन अत्यंत महत्त्वाचे लेख ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी वाचले आहेत. ‘अपुर्वाई’ आणि ‘जावे त्यांच्या देशा’ यासारखी खुमासदार प्रवासवर्णने आज श्रोत्यांच्या भेटीस येत आहेत. ‘अपुर्वाई’ हे पुस्तक अभिनेता आस्ताद काळे यांनी वाचलं आहे, तर ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकाची रंगत आवाजाद्वारे आणखी खुलवली आहे, ती अभिनेता प्रसाद ओक यांनी.

‘हसवणूक’, हे पुलंचं आणखी एक विनोदी पुस्तक. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या पुस्तकातील निवडक लेख सादर केले आहेत. तसेच ‘आमचा धंदा’, ‘माझे खाद्यजीवन’, ‘माशी’, ‘साता वारांची कहाणी’, ‘चाळिशी’, ‘रस्ते’ हे पुलंचे प्रभावळकरांनी सादर केलेले लेख श्रोत्यांना नक्की आवडतील.

‘दाद’ या पुस्तकातील ‘एक दु:खाने गदगदलेले झाड’ आणि ‘कोसला वाचल्यावर’ हे लेख पुलंनी इतर व्यक्तींच्या उत्तम कार्याला मनापासून दिलेली पोचपावती आहे. पुलंचा स्वभावच तसा, गुणग्राही आणि उत्तम कलेला, कलाकाराला मनस्वी दाद देणारा. या त्यांच्या उमद्या स्वभावातून आणि व्यासंगातून त्यांनी अनेक थोर व्यक्तींच्या कार्याची महती सांगणारी अत्यंत वाचनीय आणि अभ्यासपूर्ण स्फुटं लिहिली. ‘दाद’मधील ‘एक दु:खाने गदगदलेले झाड’ हा लेख अरुणा ढेरे यांनी वाचला आहे, तर ‘कोसला वाचल्यावर…’ हा लेख मिलिंद जोशी यांनी सादर केला आहे.

पुलंच्या जन्मदिनानिमित्त या ऑडिओबुकच्या माध्यमातून श्रोत्यांना पुलंच्या साहित्याचा आनंद घेता येईल! याखेरीज येत्या काळात ‘मैत्र’, ‘गणगोत’, ‘गुण गाईन आवडी’, ‘खिल्ली’, ‘उरलं-सुरलं’ आणि ‘पूर्वरंग’ ही ऑडियोबुक्सही लवकरच श्रोत्यांसाठी नामवंतांच्या आवाजात उपलब्ध होणार आहेत.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content