Homeचिट चॅटशनिवारपासून राष्ट्रपती भवन...

शनिवारपासून राष्ट्रपती भवन जनतेसाठी पुन्हा खुले!

राष्ट्रपती भवन सामान्य  जनतेसाठी येत्या शनिवारपासून म्हणजे 6 फेब्रुवारी पासून पुन्हा खुले होणार आहे. कोविड-19मुळे 13 मार्च 2020पासून ते बंद करण्यात आले होते. शनिवार आणि रविवारी (सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस सोडून) ते खुले राहणार आहे. अभ्यागतांना https://presidentofindia.nic.in किंवा https://rashtrapatisachivalaya.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपल्या भेटीची आगाऊ नोंदणी करता येईल. पूर्वीप्रमाणेच 50 रुपये फी यासाठी आकारली जाईल.

शारीरिक अंतराच्या निकषानुसार 10:30, 12:30, 4:30 या वेळांत आगाऊ नोंदणी नक्की करत येईल. जास्तीतजास्त 25 जणांना एका निर्धारित वेळी प्रवेश दिला जाईल. भेटीदरम्यान अभ्यागतांना मास्क घालणे, शारीरिक अंतर पाळणे या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content