HomeArchiveवादळ, लाटा आणि...

वादळ, लाटा आणि काँग्रेस..

Details
“वादळ, लाटा आणि काँग्रेस..”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई
[email protected]

काँग्रेस संपल्याच्या भ्रमात काहीजण होते. त्यांना तीन राज्यांतील निकालाने चपराक बसली असेल. मुळात काँग्रेस संपली असे मानणे अज्ञानीपणाचे लक्षण होते. वास्तविक काँग्रेस एका विशाल वटवृक्षासारखी आहे. नरेंद्र मोदी नावाच्या वादळात तिची पानझड झाली होती. काही जणांनी मात्र काँग्रेस नामक हा वटवृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा समज करून घेतला. त्याची पाळेमुळे किती खोलवर आहेत, याचा अंदाज या निकालाने सर्वांनाच आला असेल. काँग्रेसने यापूर्वीही अशी अनेक वादळे अनुभवली आहेत. त्यातील काही अंतर्गत होती तर काही बाह्य. त्यात पर्णपात झाला. पण, नव्याने पालवी फुटून काँग्रेसचे पुन्हा डेरेदार वृक्षात रूपांतर झाले, असेच इतिहास सांगतो…

शत्रू कितीही कमजोर वाटत असला तरी त्याला कमी लेखू नये, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. अन्यथा पराभव अटळ असतो, याचा प्रत्यय पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींना आला असेल. राहुल गांधी आणि सोनिया गांधी तसेच काँग्रेस पक्षातील इतर नेत्यांना गेल्या चार¬-साडेचार वर्षांत भाजपा नेत्यांकडून अपमानजनक वक्तव्य करीत हिणवले गेले. एखाद्या असहाह्य आणि बेजार प्राण्यावर तुटून पडावे, तशी भाजपाची नेतेमंडळी काँग्रेसवर तुटून पडल्याचे चित्र होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची झालेली दैना पाहता हा पक्ष संपल्याचा समज काही भाजपा नेत्यांनी करून घेतला. जणू भारत काँग्रेसमुक्त झाला आहे आणि आता भाजपाशिवाय देशाला पर्याय नाही, अशा आविर्भावात हे नेते वावरू लागले होते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणूक निकालाने या भाजपा नेत्यांना जमिनीवर आणले आहे. लोकसभेच्या एका विजयाने हुरळून जाऊन काँग्रेस संपली, असे मत बनवणे किती बालिशपणाचे होते, याचा प्रत्यय या निवडणूक निकालाच्या निमित्ताने त्यांना निश्चितच आला असेल.

काँग्रेसला शतकाचा इतिहास आहे. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणून त्याची ओळख आहे. एकशे तेहतीस वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने अनेक वादळे पाहिली आहेत. अनेक लाटा झेलल्या आहेत. पक्षांतर्गत गटबाजी असो किंवा विरोधी पक्षांची लाट अथवा जनतेचा रोष, हे काँग्रेसला नवीन नाही. मोदी लाटदेखील त्याचाच एक भाग होती. विध्वंसक वादळे असोत अथवा अजस्र लाटा या दीर्घकालीन नसतात, याचा अनुभव काँग्रेसने वेळोवेळी घेतला आहे. इतकेच की मोदी लाटेमुळे काँग्रेसची अभूतपूर्व पडझड झाली होती. कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची झाले होते. त्यातून सावरण्यासाठी काँग्रेसला एका मोठ्या विजयाची गरज होती. ती या तीन राज्यांतील निकालाने पूर्ण झाली आहे.

पंडित नेहरूंच्या निधनानंतर नेतृत्त्वावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वादळ निर्माण झाले होते. इंदिरा गांधी यांनी पक्षाची सूत्रे आपल्याकडे घेतली. त्यामुळे काँग्रेसमध्ये सिंडिकेट आणि इंडिकेट असे दोन गट निर्माण झाले. इंडिकेटचे नेतृत्त्व करणाऱ्या इंदिरा गांधींपुढे सिंडिकेटच्या बुजूर्ग नेत्यांनी मोठे आव्हान उभे केले होते. नेहरूंच्या पश्चात सन १९६४ ते १९७१ पर्यंतचा काळ काँग्रेससाठी खूपच कष्टप्रद होता. सन १९६७ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचे मताधिक्य कमालीचे घटले होते. अनेक राज्यांत सत्ता गमावली होती. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कार्यपद्धतीवर नाराज सिंडिकेट नेत्यांनी त्यांची पक्षातूनच हकालपट्टी केली. त्यामुळे काँग्रेस दुभंगली. पक्षाच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्यातूनही काँग्रेस तावून¬सुलाखून निघाली. स्वातंत्र्यपूर्व काळात यापूर्वीही १९०७ आणि १९१८ मध्ये जहाल आणि मवाळ नेत्यांच्या अंतर्गत कलहामुळे काँग्रेसचे विभाजन झाले होते. तरीही काँग्रेस आपले अस्तित्व वर्षानुवर्षे टिकवून आहे. काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांनी हा इतिहास चाळायला हवा होता.

७० चे दशक तर काँग्रेसची परीक्षा पाहणारे होते. सन १९७१ च्या मध्यावधी निवडणुकीत यशाचे नवे शिखर गाठणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसची १९७७ च्या निवडणुकीत पूर्ण वाताहत झाली. आणीबाणीनंतरचा काळ पक्षासाठी खूपच कठीण ठरला होता. स्वातंत्र्यानंतर सलग तीस वर्षे देशावर हुकूमत गाजवणाऱ्या काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. जनता पार्टीच्या लाटेत उद्ध्वस्त झालेल्या काँग्रेसची अवस्था मोदी लाटेहून वेगळी नव्हती. इंदिराविरोधी जनमताच्या रोषाने पक्ष रसातळाला गेला होता. पक्षामागील शुक्लकाष्ठ इथेच थांबले नव्हते. पक्षाच्या प्रमुख इंदिरा गांधींना तुरूंगात डांबण्यात आल्याने पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते तर सैरभैर झाले होते. काँग्रेस यातून उभारी घेईल का, असा प्रश्न प्रत्येकाला सतावत होता. पण काँग्रेस अवघ्या दोन-अडीच वर्षांत त्याच ताकदीने किंबहुना अधिक सक्षमपणे उभी राहिली. काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्यांनी या इतिहासाची उजळणी करायला हवी होती.

इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी झालेली हत्या काँग्रेससाठी आणीबाणीसारखी स्थिती होती. पक्षाचे छत्र हरवल्यामुळे नेते¬, कार्यकर्ते पोरके झाले होते. एक अनुभवी आणि निर्णयसक्षम नेतृत्त्व पक्षाने गमावले होते. काँग्रेसच्या भवितव्याविषयी पक्षातील प्रत्येक व्यक्तीला चिंतेने ग्रासले होते. राजीव गांधी यांच्या रूपात पक्षाला दूरदृष्टी असलेले एक तरूण नेतृत्त्व लाभले अन् इंदिरा गांधींच्या हत्येचे दु:ख पचवून काँग्रेसने फिनिक्स पक्ष्यासारखी नव्याने झेप घेतली. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत इतिहास रचला होता. त्याचवेळी बोफोर्स तोफांच्या घोटाळ्यात राजीव गांधी यांचे नाव आले आणि काँग्रेस पुन्हा एका नव्या संकटात सापडली. जनतेने राजीव गांधींना आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाला झिडकारून लावले. पुन्हा एकदा सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. भ्रष्टाचाराच्या जंजाळातून बाहेर पडण्यापूर्वीच ‪२१ मे‬ १९९१ रोजी झालेल्या राजीव गांधी यांच्या हत्त्येमुळे पक्षावर नवे संकट कोसळले. हा आघात सहन न करू शकलेल्या गांधी घराण्याने राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. पक्षात नेतृत्त्वावरून बेदिली माजते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अंतर्गत धुसफूस असतानाही नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस सरकारने सत्तेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पक्षाने गांधी¬-नेहरू घराण्याच्या अनुपस्थितीत आपले अस्तित्त्व टिकवून ठेवले होते. काँग्रेस अस्तित्वहीन झाली म्हणणाऱ्यांनी हा इतिहास वाचला नसावा.

सन १९९६ ला काँग्रेसने आणखी एकदा सत्ता गमावली अन् पक्षात गटबाजी माजली. गांधी घराणे राजकारणापासून दूर असल्यामुळे पक्षावर नियंत्रण नसल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. काँग्रेस संपली असाच सर्वांचा समज झाला. काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता मात्र हिंमत हरला नव्हता. तो आशाळभूत नजरेने सोनिया गांधींकडे पाहत होता. पक्षाला नवी उभारी देण्याचे सामर्थ्य म्हणा किंवा करिष्मा गांधी घराण्यात होता, याची त्याला जाणीव होती. १९९८ ला राजकीय विजनवास बाजूला सारून सोनियांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली अन् पक्षात पुन्हा चैतन्य पसरले. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर १९९८ ला ममता बॅनर्जी, १९९९ ला शरद पवार, पी.ए. संगमा, तारिक अन्वरसारख्या पहिल्या फळीतील नेत्यांनी पक्षात बंड करीत नवीन पक्ष स्थापना केले, हे पक्षासाठी मोठे वादळ होते. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेस पाच वर्षे सत्तेबाहेर राहिली. अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारची कामगिरी आणि लोकप्रियता पाहता काँग्रेसला लवकर सत्ता मिळेल, असे वाटत नव्हते. पण अवघ्या पाच वर्षांत काँग्रेस पुन्हा सत्तेत आली होती. हा सर्व इतिहास पाहता मोदी लाटेत काँग्रेस संपली असा अनुमान काढणे किती बुद्धिहीन होते, याचा प्रत्यय येतो. असो. मोदी लाटेत उद्ध्वस्त झालेली आणि इतिहासातील अत्यंत वाईट काळ अनुभवणारी काँग्रेस पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालात मिळालेल्या यशामुळे पुनरूज्जीवित झाली आहे. अवसान गाळून बसलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना या निकालाने नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी हा निकाल बूस्टर ठरला आहे. त्यामुळे मोदी लाटेवर तरंगणाऱ्या भाजपाला नव्या ताकदीने आगामी निवडणुकीला सामोरे जावे लागेल, एवढे मात्र निश्चित!”
 
“संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content