Details
धुळे महापालिकेत कोण हरलं? कोण जिंकलं?
01-Jul-2019
”
भानुदास तानाजी पानमंद
[email protected]
धुळे महापालिकेची नुकतीच झालेली निवडणूक अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली होती. भाजपा आणि आमदार अनिल गोटे अशी लढाई प्रारंभी वाटत होती. पण गोटे अण्णांना लढाई आधीच खिंडीत गाफील गाठण्यात आलं.. इच्छूक उमेदवारांना कात्रजचा घाट दाखवला गेला. सर्व मार्ग वापरून भाजपाने मैदान मारलं आणि सत्ता मिळवली.
धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला कायच्या काय यश मिळालं. म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अवघे तीन नगरसेवक असणाऱ्या पक्षाला एकदम एकहाती ५० जागा मिळाल्या. असा नक्की कोणता चमत्कार घडला की, भाजपा जिथे विरोधी पक्षात बसायला तयार असताना एकदम पालिकेची सूत्रे हातात घेणारा मुख्य पक्ष ठरला. याला कारणीभूत स्थानिक नेते मंडळी, त्यांनी आखलेल्या योजना, अमलात आणलेली सूत्रे, युद्धपातळीवर केलेले कार्य, त्यासाठी घेतलेली अफाट मेहनत… वगैरे वगैरे… या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं ठरलं ते त्यांनी निर्माण केलेलं संभ्रमाचं वातावरण आणि समोरच्या पक्षाने लढण्याआधीच खाली ठेवलेली शस्त्रे.
संभ्रम म्हणजे धुकंट (ढगाळ) वातावरण जेथे रस्त्यावर दिव्यांची गाडी चालवणंही अवघड असतं आणि हवेत प्रखर उजेडाचं विमान उडवणंदेखील असंभव असतं. मग येथे तर संपूर्ण गाडा ओढायचा होता तोही आपल्या स्वत:च्या कर्तबगारीवर आणि संभ्रमाच्या संमोहित वातावरणावर. या वातावरणाची विरोधकांना अशी काही धडकी भरली की, फक्त मैदान सोडून पळता येत नाही, लढाई लढायची म्हणून लढवली. नाही तरी हरणारच होते. फक्त तग किती वेळ धरणार एव्हढंच पाहणं त्यांच्या हाती उरलं होतं.
इतर पक्षांचं असं मैदान सोडून पळणं, हेच “भाजपा” विजयाचं खरं गमक राहिलं. नाही तर त्रूटी त्यांच्यातही होत्याच. फक्त त्याचा फायदा उचलणारा तिथे उपस्थित नव्हता एव्हढंच. या निवडणुकीच्या रणधुमाळीचा मीही एक साक्षीदार ठरलो. म्हणजे भाजपाच्या वतीने पक्षाचा निवडणूक सर्वेक्षण (जनमत चाचणी/सर्वेक्षण) करण्यासाठी निवडणुकी अगोदर दोन महिन्यांपासून मी तिथे उपस्थित होतो. पक्षाने आमच्या कंपनीला सर्व्हेक्षण करण्याचं काम दिलं होतं आणि त्याच सर्वेक्षणाच्या आधारे त्यांना आपले उमेदवार निवडायचे होते. मला वाटतं येथूनच ‘संभ्रम’ चालू झाला. यावेळची धुळ्याची निवडणूक भाजपाने आपल्या इभ्रतीची केल्याने सगळेच स्थानिक नेते कामाला लागले होते. त्यातच त्यांनी गेल्या वर्षापासून एकच लक्ष्य ठेवले होते. एकूण १९ प्रभागांमधील स्वत:च्या विजयाची खात्री बाळगणारे, सगळेच आपल्याच पक्षात यायलाच हवेत. मग, ते कोणत्याही पक्षाचे नगरसेवक का असेनात. कारण ‘आम्हांला व्यापार कळतो’ हेच ब्रीद ठरवून स्थानिक पक्षश्रेष्ठींनी जाळं फेकायला सुरूवात केली. सुरूवातच दणक्यात झाली म्हटल्यावर पुढची गणितं सोप्पी पडली. पहिल्या फटक्यातच मुख्य पक्षाचा महापौर आणि दुसऱ्या पक्षाचा ‘विरोधी पक्षनेता’ गळाला लागल्याने बाकीच्यांचं काय?
आम्ही मेंढ्या वळत बसण्यापेक्षा मेंढपाळच हाताशी धरतो. त्यामुळे काय, मेंढपाळ जातो तिकडे मेंढ्या जाणारच, यात नवल ते काय? मोठी धेंडं हाताशी आल्यावर लहानग्यांसाठी पक्षाला काहीच करावं लागलं नाही. ते आपोआपच आपल्या “आदर्शां”चा कित्ता गिरवत वळचणीला येऊ लागले. पहिलं तर त्यांचं येणं अपेक्षितच नव्हतं. पण, जेव्हा त्यांच्या येण्याला सुरूवात झाली तेव्हा त्यांना थांबवणंही कठीण होऊन बसलं आणि येथूनच अंतर्गत बंडाला सुरूवात झाली. कारण येणारा प्रत्येकजण आपली जागा बनवून येत होता. (म्हणजे अगोदरच्याला धक्का मारून बाजूला करायचं आणि त्याच्याच जागेवर आपला अधिकार दाखवायचा) मग, पहिल्यापासून पक्षात असणाऱ्यांचं काय? त्यांनी किती काळ सतरंज्याच उचलायच्या? त्यांनीही मनात काही मांडे रचले असतीलच ना..! पण येणाऱ्यांच्या विजयाची खात्री ते स्वत: देत होते (आमचं सर्वेक्षणदेखील होतं संगतीला) पण जुन्या जाणत्यांच्या विजयाची खात्री, ते तर सोडा पण खुद्द पक्षही देऊ शकत नव्हता. मग पारडं कोणाचं जड? जे विजय मिळवून आणू शकतात त्यांचंच ना. अर्थात बाहेरून आलेल्यांचं.
जिथे पक्षाच्या एकमेव आमदारालाच डावललं गेलं, तेथे खाली गळून पडलेल्या पाला-पाचोळ्याचं काय? उडू द्या वाऱ्यावर नाहीतर झाडूनं दूर लोटा.. त्याने काय फरक पडतोय. शेवटी तो काय कचराच ना..! यांच्या या मेगाभरतीत बाकीचे सगळेच पक्ष रिते झाले. जिथे फक्त छिद्र पडायला हवं तिथे एक मोठं भगदाडच पडलंय म्हंटल्यावर लिंपणार तरी कुठं आणि कसं? अपमान तर झाला होता. पण बदला घेण्याची ताकद अंगात उरलीच नव्हती, अशा या अंधुकशा प्रकाशात एक ‘वृद्ध’ जवान उठला, लढायला.. मग काय शत्रूचा शत्रू तोच आपला मित्र मानून सगळ्यांनीच त्याला जाहीर पाठींबा दिला. पण भरल्या मैदानात वैचारिक पाठींब्यापेक्षा दोन-चार हत्यारं पुरवली असती तर, ती काही कामाला तरी आली असती. पण येथे हत्यारं होती कोणाकडे शिल्लक? होतं फक्त पोकळ आश्वासन. “अण्णासाहेब तुम आगे बढो.. हम मजा देखते है”.
आपल्या शत्रूला आता आपल्यातील फुटीर मिळू नये म्हणून या पक्षानेही कंबर कसली. सर्वांच्या पुढे सर्वेक्षणाचं गाजर ठेवलं. “जर या सर्वेक्षणात पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर तुम्ही राहिलात तर तुमचाही उमेदवार म्हणून विचार होऊ शकतो”, पुन्हा संभ्रम तयार झाला. ज्यांना माहित होतं आपली डाळ शिजणारच नाही त्यांनीदेखील नशीब आजमावयाचं निश्चित केलं. म्हणजे आपण वेगळी चूल मांडावी आणि येथे नशिबाने दान आपल्या पारड्यात टाकलं तर पक्षाशी गद्दारी म्हणून हकालपट्टी निश्चित. यापेक्षा वाट पाहणं कधीही चांगलं. म्हणून बहुतेकांनी धीराची कढी चाखली. दररोज होणारे निरनिराळे आरोप आणि त्याला दिलं जाणारं थातूरमातूर उत्तर यातून सगळ्यांच्याच डोळ्यावर धूळफेक होऊ लागली. कोणाला काहीच समजत नव्हतं आपण नेमकं काय करावं? यातच फॉर्म भरण्याची तारीख तोंडावर आली तसे पक्षाने सगळ्यांनाच फॉर्म भरायला सांगितले म्हणजे एकाच जागेसाठी स्वपक्षाचेच चार-चार विरोधी उमेदवार. तसा काहींच्या डोक्यात उजेड पडला. आपल्याला डावललं गेलंय हे समजातच त्यांनी या बंडखोर पैलवानाच्या मागे उभं राहण्याची हिंमत दाखवली. पण तोपर्यंत पक्षाने अर्धं मैदान मारलं होतं.
एकाच पक्षाच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर झाल्या. त्यावेळी या आमदार वीराला पक्षाच्या थोरल्या नेत्याने सबुरीचा सल्ला आणि आश्वासनही दिलं. तुम्हीच आमचे थोरले नेते आहात. तुम्हांला डावलता येणार नाही. सगळं तुमच्याच मनासारखं होईल. फक्त लहानांना समजून थोडा वेळ द्या..! आता पक्षश्रेष्ठींनीच आपल्यापुढे लोटांगण घातलं म्हटल्यावर थोडा काय “take your own time” (तुमची वेळ तुम्हीच ठरवा) इकडे स्वपक्षीयांचे सर्वांचेच जीव तर टांगणीला लागलेच. पण, बाहेरून भरती केलेल्या शूर वीरांचेही जीव काकुळतीला आले (ना इकडचे ना तिकडचे). आता करायचं तरी काय? सगळेच ढग आणि सगळीकडेच धुकं..!
फॉर्म तर सगळ्यांनीच भरले होते. पण पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून लागणारे “AB” फॉर्मचे वाटप अजून बाकीच होते. म्हणजे अजूनही ‘आशा’ जिवंत होती. शेवटच्या दिवशी दुपारी २.३० वाजता उमेदवारांचे “AB” फॉर्म भरण्याची अंतिम वेळ आणि २.०० पर्यंत सगळ्यांचे जीव टांगणीला. पारडं कोणाच्या बाजूने झुकतं पाहण्यासाठी सगळेच उतावीळ. म्हणजे “शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड” अशी जीवघेणी अवस्था प्रत्येक उमेदवाराची होती. आणि अचानक बातमी फुटली, ‘भाजपा’ने आपल्या सगळ्या अधिकृत उमेदवारांचे “AB” फॉर्म भरलेसुद्धा. सगळेच अवाक् झाले. एकदम आभाळच कोसळलं. पायाखालची जमीन सरकली. मग, आधार तरी कुठे शोधावा? सेनापतीने (स्थानिक आमदार) अंगच सोडून दिलं. तसे ते खाडकन खुर्चीवर कोसळले. गनिमाने आपल्याला ‘संभ्रमात’ ठेऊन डाव टाकलाच तर.. सगळ्यांची हत्यारं गळून पडली. कोणाला काहीच सुचत नव्हतं. एकाच चिन्हावर निवडणूक लढवायची म्हणून सगळेच वाट पहात होते आणि आता तर सगळंच संपलं होतं. कौरवांच्या भर चक्रव्यूहात अडकल्यावर अभिमन्यूची जेवढी दुरवस्था झाली नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक दुरवस्था स्थानिक आमदार आणि त्यांच्यापाठी चिलखत घालून तयार झालेल्या सेनानींची झाली. आमदार साहेब आणि त्यांच्याच पक्षाच्या भांडणात आपली पोळी भाजून, झालेल्या घटनेचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्यांच्या हाताला साधा जळालेला कोळसाही लागू नये यापेक्षा त्याचं मोठं दुर्दैव ते काय?
संभ्रमाच्या या फेऱ्यात ‘भाजपा’ सर्वांनाच संमोहित करण्यात यशस्वी ठरली असंच मी म्हणेन. नाहीतर ना त्यांची ‘डॉक्युमेंटरी’ (माहितीपट) व्यवस्थित चालली, ना LED व्हॅन वेळेत आल्या. एव्हढंच कशाला, मोठ्या तोऱ्यात आणि डामडौलात आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवलेली ‘मनमाड-इंदौर’ रेल्वे तर यार्डातून बाहेर पडलीच नाही. तरी ते जिंकलेच..! कारण सगळ्याच पक्षांनी लढायच्या आधीच स्वीकारलेली शरणागती आणि ‘थोरल्या’ साहेबांनी शेवटच्या क्षणी दाखवलेली आस…
ताक:- संभ्रमाच्या या गढूळ वातावरणात (लाटेत) असे काही उमेदवार निवडून आलेत की, त्यांना आजही विश्वास बसलेला नाही की, खरंच आपण निवडून आलोय आणि “नगरसेवक” झालोय.. बिचारे अजूनही याच संभ्रमात आहेत की, निवडणूक अजूनही व्हायचीचय.!!”
“भानुदास तानाजी पानमंद