Details
“भाई, माफ करा महाराष्ट्र सरकारला!”
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व.. किती गौरवलं होतं आम्ही तुम्हाला.. तमाम महाराष्ट्राचे वैभव होतात तुम्ही भाई.. पण आता तुम्ही नाही आणि तुमच्या नावाने, तुमच्या लिखाणाने प्रफुल्लित होणारी पिढीही फारशी उरलेली नाही. जी आहे तिचं म्हणणं फार कुणी मनावर घेत नाही. नव्या पिढीतील बहुसंख्यांना पुलं वगैरे ओल्ड थिंग्ज, रायटरमध्ये फार इंटरेस्ट नाही, यु नो. त्यामुळे तुम्ही हात पाठीमागे घेऊन जे क्षितिजाकडे पाहात होतात तेच योग्य होतं.. कारण आपल्या महाराष्ट्रात आता फारसं काही पाहण्यासारखं उरलेलं नाही. अगदी तुमचा चित्रपटही पाहावा की नाही हे आता मल्टिप्लेक्सवाले ठरवणार.
त्यांच्याकडच्या उपलब्ध तपशीलानुसार मराठी फिल्म म्हणजे बिग बजेट हिंदी चित्रपटांच्या मध्ये कुठेतरी सकाळी, दुपारी लावण्याची रिळं. ते देतील तेवढेच शो गेली काही वर्षे मराठी चित्रपटांच्या नशिबी येतात आणि बहुतेक मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक जे मिळालं ते चालवून घेतात. तसेही आपण मराठी पूर्वीपासूनच अल्पसंतुष्ट. आपल्या मराठी बाण्याविषयी तुम्ही किती खुमासदार लिहिलं होतं वेगवेगळ्या मजकुरातून. त्याची खुमारी अद्याप कायम आहे पण ती मराठी चित्रपटातून येणार म्हटल्यावर पडद्याच्या नाड्या या मल्टिप्लेक्सवाल्यांच्या हातात. त्यातून तुम्ही मराठी मनांचे हृदयसम्राट वगैरे नाही. त्यामुळे तुमच्यावरील चित्रपटासाठी कुणी आवाज देण्याचीही शक्यता नाही. मराठी माणसासाठी शिवसेना, मनसे आहे म्हणतात पण त्यांच्या सेनेचे चित्रपट असतात तेव्हाच या पक्षांना कंठ फुटतो. तुमचा चित्रपट लागतोय म्हणून तुम्ही मोठ्या लगबगीने स्वर्गातून आपल्या मुंबई, पुण्यात यायला निघालाय अशी एक सुंदर पोस्ट व्हायरल झालीय. ती वाचली आणि खिन्न हसलो. उगा तुम्ही येण्याचे कष्ट घेताय. मुंबईत या किंवा पुण्यात तुम्हाला तुमचाच चित्रपट लागलेले थिएटर शोधायला लागणार आहे.
तुम्हाला अवघ्या महाराष्ट्राने तुमच्या नावाची पताका सातासमुद्रापार अभिमानाने मिरवली. साहित्यातील सोनेरी लखलखते पान आमच्या भाग्यात आले होते. पण तुमचा चित्रपट सर्वदूर चाहत्यांना पाहता यावा यासाठी थिएटरचे पडदे आपल्याच मराठी महाराष्ट्रात नाहीत. मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांमध्ये चित्रपटगृह नाहीत. मराठी माणसाबद्दल आस्था दाखवणारे आपले सरकार रमाकांत आचरेकरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करायची तसदी घेत नाही. श्रीदेवीसाठी मात्र धावपळ केली जाते. असे आस्थेवाईक सरकार मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये प्राधान्याने दाखवले गेलेच पाहिजेत, असे कागदी घोडे नाचवते. पण, तुमच्या चित्रपटासाठी या मल्टिप्लेक्स चालकांना, सिंगल पडदागृहांना खडसावायला कचरते.
हे सगळे आता आमच्या नजरेसमोर घडते आहे. म्हणून म्हटले की आम्हाला माफ करा.. तुम्हीही यायची उगाच तसदी घेऊ नका. तुमच्या पुण्यातच तर थिएटर मिळत नाहीत. कुठलेतरी चारदोन शो मिळाले आहेत. तुमच्यावरील चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजेरकरही सर्व अवस्था पाहून त्यांना मराठी असल्याची लाज वाटतेय! असे म्हणत दु:ख वगैरे चेहऱ्यावर दाखवत आहेत. पण याच मांजेरकरांनी याआधी फार कधी इतर मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केल्याचे ऐकण्यात आले नव्हते. खरी गोष्ट अशी आहे की मांजरेकर असोत वा आणखी कुणी, शिवसेना असो कि मनसे, जेव्हा आपल्याशी संबंधित चित्रपट असेल तेव्हाच यांची तोंडे उघडतात. मराठी चित्रपटांबद्दल राज ठाकरे यांना कळकळ आहे असे सांगितले जाते पण मराठी प्रेक्षकांना मल्टिप्लेक्सच्या खाद्यपदार्थ स्टॉलवर जे लुटले जाते त्याबद्दल मनसेने दिलेला आवाज आता एकदम लुप्त झाला आहे. सिंबा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुडूंब पैसा खेचत आहे. दुसऱ्या आठवड्यातही मुंबई, पुण्यात सिंबाची चलती आहे.
दररोज १५० ते ३०० शो सिंबाचे असताना ‘भाई- व्यक्ती आणि वल्ली’ या तुमच्यावरील चित्रपटाला मात्र अवघे ४० ते ५० शो देण्यात आले आहेत. याबद्दल एकाही मराठी नेत्याने तोंड उघडलेले नाही. मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये लागलेच पाहिजेत, त्यांना प्राईम टाईम मिळायलाच हवा, अशी सरकारची भूमिका आणि तशी कायदेशीर तरतूदही आहे. पण मराठी मनांचे, मराठी जनांचे सरकारही मुखदुर्बल झाले आहे. दरवेळी कुठल्या ना कुठल्या मराठी चित्रपटाचा विषय समोर येतो, संबंधित व्यक्ती खंत व्यक्त करतात, ताकद असेल तेवढ्या क्षमतेने इशारे दिले जातात. प्रदर्शनाच्या आगेमागे उलटसुलट चर्चा होते. सरकार मात्र शांतपणे मराठी चित्रपटांची ही ससेहोलपट पाहत असते. कायदे खूप आहेत, नवीनही केले गेले आहेत. पण ते अंमलात आणण्याची, कायदा मोडणाऱ्यांना वठणीवर आणण्याची, दरडावण्याची हिंमत लागते. मराठी राज्यातील मराठी लोकप्रतिनिधींच्या, उठसूठ मराठीसाठी गहिवरणाऱ्या सरकारने मराठी चित्रपटांसाठी ताठ कणा दाखवण्याची ही ताकद कधीच गमावली आहे. त्यांनाही माफ करा भाई!”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान