HomeArchiveये मराठी टक्का...

ये मराठी टक्का क्या है भाई?

Details
ये मराठी टक्का क्या है भाई?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासूनचा धगधगता काळ आठवला की आजही मराठी माणसाची छाती अभिमानाने तटतटून येते. मुंबई आपली, महाराष्ट्र आपला असे आपण गेली कित्येक वर्षे अभिमानाने गर्जत आलो आहोत. प्रत्यक्षात मराठी माणसाचा टक्का या मराठी मातीतूनच हळूहळू कमी होत चालला आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालाने मुंबईतूनच मराठी माणूस हद्दपार होत चालल्याचा इशारा दिला आहे. पण हे काही आजचे नाही. १९८० च्या निवडणुकांत तेव्हाच्या चिपळूण मतदारसंघात प्रचारासाठी फिरत होतो. तेव्हा चिपळूण स्टँडच्या मागे दीपक लॉज आणि खानावळीत भेटलेल्या एका दाक्षिणात्य व्यक्तीने त्यांच्या मंदिराचा विषय काढल्यावर, सहज विचारले की किती दाक्षिणात्य व्यक्ती वा विक्रेते चिपळूणला असतील? त्याने त्यावेळी दिलेले उत्तर विलक्षण होते. तो म्हणाला चिपळूण ते रत्नागिरी या पट्ट्यातच आमचे साधारण ६०० सदस्य आहेत. आणखी पुढे जाऊन कुणी व्यवसाय करत असतील ते वेगळे. त्यानंतरच्या काही वर्षांत मग खाली सिंधुदूर्गातही केरळी बांधवांनी येऊन रबर लागवड वगैरे सुरू केली, हॉटेलं टाकली तो वेगळा इतिहास.

या सगळ्यांना परप्रांतीय असा शब्द वापरात यायला तेव्हा काही वर्षे अवधी होता. त्याआधीच कुठूनकुठून महाराष्ट्रात येऊन काही पिढ्या स्थिरावून इथल्याच झालेल्या इतर राज्यांतील समाजाने राज्याची समृद्धता वाढवली होती. पण नंतर या राज्याच्या समृद्धतेने, उद्यमशीलतेने, रोजगारांच्या, व्यवसायांच्या संधीने, आर्थिक आघाडीने रोजगाराच्या शोधातील लोंढ्यांना आकृष्ट केले. शेजारच्या राज्यांतून जणू मुंबईवर आक्रमणच व्हायला सुरूवात झाली. जो येतो तो मुंबईकडे धावला अशी स्थिती झाली. शेजारधर्म संपला, राज्याची क्षमता संपली. मुंबईसोबत राज्याच्या इतर भागांतही आपल्या हिंदी भाषिक शेजाऱ्यांनी हातपाय पसरले. ही प्रक्रिया गेली १५ ते २० वर्षे सुरू आहे. आता गेल्या आठ वर्षांत पाहिले तर मुंबईतला मराठी माणसाचा टक्का घसरलाय आणि हिंदी भाषिकांचा वाढलाय. तोही तब्बल दहा पटीने. मराठी माणसांनी मोठ्या घरांसाठी ठाणे, नालासोपरा, डोंबिवली, कल्याण ते अगदी टिटवाळा, कर्जतपर्यंत वाट धरली आणि मुंबई इतर भाषिकांना मोकळी झाली.

आता हिंदी भाषिकांचा टक्का या महानगरीत वाढला आहे. याचा परिणाम लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच महापालिका निवडणुकीवर गेली काही वर्षे स्पष्टपणे दिसतो आहेच. प्रत्येक व्यवसायात, रोजगाराच्या अनेक क्षेत्रांत हिंदी भाषिकांनी बस्तान बसवल्यामुळे त्यांची टक्केवारी वाढते आहे. 2011 च्या जनगणनेनुसार हिंदी भाषिकांचा आकडा 40 टक्क्यांनी वाढला आहे. 2001 मध्ये ही संख्या 25.88 लाख होती, तीच दहा वर्षांत 35.98 लाख झाली आहे. म्हणजे 10 वर्षांत तब्बल 10 लाख हिंदी भाषिक वाढले. त्याचवेळी मराठी माणूस 2.64 टक्क्यांनी घटला. 2001 मध्ये 45.23 लाख मराठी मातृभाषिक होते, तेच 2011 मध्ये 44.04 लाख झाले आहेत. डिपार्टमेंट ऑफ मायग्रेशन अँड अर्बन स्टडीज ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑप पॉप्युलेशन सायन्सचे राम बी. भगत यांनी त्यांच्या “Population Change and Migration in Mumbai Metropolitan Region: Implications for Politics and Governance” या अभ्यासात मराठी टक्का घसरल्याचा तपशील दिला आहे. या अभ्यासानुसार, महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्यांची संख्या 1961 मध्ये 41.06 टक्के होती, ती 2001 मध्ये 37.4 टक्के झाली. तर याच काळात उत्तर प्रदेशातून 1961 मध्ये 12 टक्के व्यक्ती यायच्या त्या आता 24 टक्के म्हणजे दुप्पटीने येतात. बिहारमधून येणाऱ्यांची संख्याही 3.5 टक्क्यांवर गेली आहे. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांतही हिंदी भाषिकांचे प्रमाण वाढले आहे.

अहवाल सांगतो त्यानुसार, मुंबईतील मराठी भाषकांची संख्या अडीच टक्क्यांनी घटली आहे तर हिंदी भाषिकांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. शेजारील ठाणे जिल्ह्यातही 80 टक्के हिंदी भाषिक वाढले असून रायगडमध्ये हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढले आहे तर कल्याण आणि मीरा-भाइंदरमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २००१ च्या जनगणनेत आपली मातृभाषा मराठी असल्याचे 45 लाख 23 हजार लोकांनी नोंदवले होते. 2011 मध्ये केवळ 44 लाख 4 हजार लोक मराठी मातृभाषा असल्याचे सांगतात हे गंभीर मानले पाहिजे. लाखभऱ मराठी लोक गेले कुठे? मतांच्या टक्केवारीकडे लक्ष ठेवून असणारे राजकीय पक्ष आणि नेत्यांना या मराठी टक्क्याचे काही पडलेले नाही हे वारंवार दिसत असतेच. त्यांना मराठी मतांपेक्षा हिंदी मतांवर निवडून येणे अधिक सोपे आहे. आता पुढली जनगणना २०२१ ला होईल. मराठी माणूस कुठेही गेलेला नाही उलट वाढलेला आहे, हे या जनगणनेतून दिसून येईल, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत. शेजारच्या आपल्या गोव्यातही मराठी माणूस दीड लाखाने घटला आहे. देशात मराठी मातृभाषा म्हणून नोंद केलेल्यांची संख्या 8.30 कोटी आहे. असे असताना ये मराठी टक्का क्या है भाई, असे विचारण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content