Details
शहिदांना नमन!
01-Jul-2019
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरेरे! जम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी नको ते घडले. भ्याड पाकड्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 42 जवान शहीद झाले. जम्मू-काश्मीरचे निसर्गरम्य खोरे जवानांच्या रक्ताने लालबुंद झाले. सुट्टी संपवून कर्तव्य बजावण्यासाठी निघालेल्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले. काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आजवरचा सर्वात भीषण हल्ला आहे. किंबहुना, हा हल्ला त्या जवानांवर नसून भारतावर झाला आहे. ज्या विकृत अतिरेक्याने स्फोटकांची गाडी जवानांच्या गाड्यांच्या ताफ्यात घुसवून आपला जीव दिला, तो घटनास्थळापासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर राहणारा होता. त्याने 350 किलो स्फोटके असलेली कार ताफ्यात घुसविली. त्यामुळेच इतकी मोठी जिवीतहानी झाली.
वास्तविक, ज्या महामार्गावर हा हल्ला झाला, तो सर्वाधिक सुरक्षित मानला जातो. ठिकठिकाणी जवानांकडून गाड्यांची तपासणी केली जाते. मग या तपासणीतून स्फोटके असलेली गाडी कशी सुटली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका झाली. तेव्हादेखील संपूर्ण देश हादरला. इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्ससारखी स्फोटके मुंबईत आली कशी? याची चौकशी केली असता पोलिसांना लाच देऊन ही स्फोटके मुंबईत आणली गेल्याचे निष्पन्न झाले. जम्मू-काश्मीरमध्येदेखील नेमके असेच काहीतरी घडले असावे. अतिरेकी एवढ्या मोठ्या हल्ल्याची तयारी करीत असताना गुप्तचर यंत्रणांना त्याचा सुगावा लागू नये, ही शरमेची बाब आहे. जर या यंत्रणा सावध असत्या तर गुरूवारचा हल्ला टळू शकला असता. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी टि्वट केले की, ‘आमच्या शूर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.’ उरीतील हल्ल्यानंतर त्यांनी म्हटले होते, `या भ्याड हल्ल्यामागे जे कोणी असतील त्यांची गय केली जाणार नाही.’ तथापि, उरीतील हल्लेखोर अद्यापही मोकाट आहेत. यावर छप्पन इंची छातीचा दावा करणारे आमचे पंतप्रधान काय खुलासा करणार आहेत?
`बुलेट फॉर बुलेट’ हेच धोरण हवे!
80 च्या दशकात पंजाब पेटला होता. अतिरेक्यांनी तेथे धुमाकूळ घातला होता. कृषीसंपन्न अशा हिरव्यागार पंजाबमध्ये रोज रक्ताचे पाट वाहत होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत:च्या प्राणाची आहुती देत जर्नेलसिंग भिंद्रनवाले या अतिरेक्याच्या म्होरक्याला त्याच्या हस्तकांसह यमसदनी पाठविले. सुवर्णमंदिरातून अतिरेक्यांना आपल्या शूर जवानांनी उखडून काढले. आपल्या प्राणांचे मोल देत या जवानांनी सुवर्णमंदिराला लागलेली कीड नष्ट केली. पण तरीही पंजाबातील रक्तपात थांबला नाही. इंदिराजींचा बळी गेल्यानंतरही पंजाब रक्तलांच्छीत होतच राहिला. पण सुपर कॉप म्हणून विख्यात झालेले ज्युलियो रिबेरो यांची पंजाबचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आणि संपूर्ण चित्रच बदलले. रिबेरो यांनी अतिरेक्यांच्या बाबतीत असलेले मवाळ धोरण झटकले. `बुलेट फॉर बुलेट’ हे धोरण त्यांनी स्वीकारले. अतिरेक्यांच्या गोळ्यांचे उत्तर गोळ्यांनी देण्यास सुरूवात झाली. रिबेरो यांच्या `बुलेट फॉर बुलेट’ या पुस्तकात या घटनांचे सविस्तर वर्णन आहे. रिबेरो यांच्या कणखर धोरणामुळे अतिरेक्यांना पळता भुई थोडी झाली. त्यांनी रिबेरो आणि त्यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्लादेखील चढविला. पण रिबेरो खचले नाहीत. त्यांनी अतिरेक्यांविरूद्ध सुरू केलेली मोहीम सुरूच ठेवली. परिणामी, काही दिवसांतच अतिरेक्यांचा खातमा झाला. पंजाब पुन्हा पूर्वपदावर आला.
रिबेरो यांचे धोरण यशस्वी ठरले. जे पंजाबमध्ये घडू शकले ते जम्मू-काश्मीरमध्ये का घडू शकत नाही? अतिरेक्यांविरूद्ध कठोर कारवाई केवळ टि्वटद्वारे अथवा कागदोपत्री करून चालणार नाही. जम्मू-काश्मीरच्या भूमीवर ती झाली पाहिजे. `बुलेट फॉर बुलेट’ या धोरणानेच ती होणार आहे. पाकड्यांना धडा शिकविण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. सरकारने हा मार्ग अवलंबावा, असे आम्ही सरकारला आवाहन करत असताना आमच्या शहीद जवानांना आम्ही नमन करतो.”
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर