Details
या सिद्धूची पूजा खेटरांनीच बांधावी लागेल!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
देशभर संतापाची लाट उठलेली असताना आणि “मोदीजी, पाकिस्तानचे कंबरडे मोडणारा धडा शिकवाच!” अशी हाकाटी सर्वत्र उठत असतानाच नवज्योतसिंह सिद्धू पचकला आहे. त्याचा सवाल आहे की “मुठभर लोकांच्या वेडेपणासाठी एका देशाला तुम्ही कसे काय दोषी ठरवता?” विशेषतः, पाकिस्तानाचे पंतप्रधान माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांची मोठीच कणव सिद्धूला आलेली आहे. वस्तुतः इम्रान खानांचा निवडणुकीतील विजयच पाक लष्कर आणि त्यातल्या त्यात आयएसआय यांच्यामुळे शक्य झालेला आहे, असे पाकिस्तानी माधम्यांनीही म्हटले होते. पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पराभव करण्याचे पाक लष्कराने मनावरच घेतले होते आणि त्यांनी इम्रानला पूर्ण पाठिंबा दिला होता. पाकिस्तानी लष्कराची गुप्तचर यंत्रणा, इंटर सर्विसेस इंटेलीजन्स – आयएसआयने तर जैश ए मुहंमद आणि लष्कर ए तोयबाच्या अतिरेकी गटांनाही त्या निवडणुकीत कामाला लावले होते. या सर्वांचा मिळून उमेदवार असणारे इम्रान खान पाकचे पंतप्रधान बनताच त्यांनी लष्कराचे प्रमुख बाजवा यांची मुक्तकंठाने स्तुती केली. याच बाजवांना मिठी मारून सिद्धू परत आला होता. मुळात सिद्धूने पाकच्या अंगचटीला जाण्याचे करणच नव्हते, पण गेला.
पंजाबमधील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री बनल्यानंतर सिद्धूने अधिक जबाबदारीने वागावे अशी जर कुणाची अपेक्षा असेल तर ती या आचरटाने फोलच ठरवली. पाक भेटीच्या त्याच्या अगाऊपणावर तेव्हा देशभरात झोड उठलीच होती. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी तो गेला तेव्हाच पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंद्र सिंह रागावले होते. “सिद्धूला जायचे तर त्याने व्यक्तीगत निमंत्रणावर जावे, पंजाबचा मंत्री म्हणून त्याला जायला माझी परवानगी नाही,” असे त्यांनी ठणाकावलेच होते. स्वतः मुख्यमंत्री कॅप्टन सिंह साहेबांनाही पाकिस्तान सरकार स्थापनेच्या कार्यक्रमात सहभागी व्हा असे निमंत्रण इम्रानने धाडले होते. पण त्यांनी निमंत्रण नाकारले होते. सिद्धू अगाऊपणाने तिकडे गेला. खरेतर पंजाबमध्येही पुन्हा दहशतवादाचा प्रसार व्हावा, स्वतंत्र खालिस्तान देशाच्या निर्मितीचे १९७०-८० च्या दशकातील जे आव्हान पाकसमर्थक अतिरेक्यांनी दिले होते ते पुन्हा जागे व्हावे असा प्रयत्न पाक सरकार छुपेपणाने करत आहे. म्हणूनच तर कॅ. सिंह यांनी पाकला सध्या न जाण्याचा निर्णय केला होता. पण सिद्धू गेला आणि भारतीय सैनिकांवर रोज हल्ले घडवणाऱ्या आणि भारतात काश्मीर खोऱ्यात तसेच पंजाबमध्येही दहशतवाद वाढावा यासाठी धडपड करणाऱ्या लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारून परतला होता.
त्याला पाकप्रेमाचे उमाळे येतच असतात. कर्तारपूरसाहेब कॅरीडॉर बांधला जावा यासाठी मी प्रयत्न करत होतो. म्हणून बाजवा यांची गळाभेट घेतली असा खुलासा त्याने केला होता. या सिद्धूने आताही अकलेचे दिवे पाजळले आहेत आणि पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानाला वा इम्रान खान यांना दोषी कसे धरता येईल असा सवालही केला आहे. त्याच्या या अगोचरपणाचे आता कौतुकच करायचे की त्याला जोड्याने मारायचे? हे आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ठरवावे लागेल.
इम्रान खान जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हाच आयएसआयमध्येही काही बदल झाले. त्याआधी पाक लष्कराच्या उत्तर सैन्यदालाचे नेतृत्त्व करणारे लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्याकडे बाजवा आणि इम्रान खान यांनी आयएसआयची जबाबदारी सोपवली आणि भरतीय सैनिकांचा रक्तपात घडवल्याबद्दल काल त्याला मोठी शाबासकीही मिळाली. या ले. जन. मुनीर याच्या कामाच्या पद्धतीमध्ये पुलवामा हल्ला फिट बसतो असे या क्षेत्रातील भारतीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. लष्करी, निमलष्करी दलाच्या मोटार वाहनांच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली गाडी नेऊन आदळवणे हे काम म्हणजे त्यांना मुनीरचा खास शिक्काच वाटत आहे. मुळात निमलष्करी दलाच्या जवानांच्या गाड्या प्रवास करत असताना तिथे अतिरेक्याची गाडी घुसलीच कशी? त्याला कुणी हटकले कसे नाही? हा रस्ता अन्य वाहनांसाठी बंद केलेला नसतो का? असे प्रश्न आपल्याला पडतात. त्याची उत्तरे सुरक्षा दलांनी दिलेली आहेत. जम्मू ते श्रीनगर हे २७१ किलोमीटरचे अंतर पार करणे हे सुरक्षादलांच्या गाड्यांना नेहमीच आव्हानात्मक ठरले आहे. पूर्वी लष्करी-निमलष्करी वाहनांचा काफिला प्रवासाला निघायचा त्या काळात हा रस्ता खाजगी वाहनांना पूर्णतः बंद केला जायचा. पण तसे केल्याने सर्वसामान्य काश्मिरी नागिरकांना त्रास होतो अशा तक्रारी फारूख अब्दुल्ला यांच्या राज्य सरकारने त्या काळात केल्या.
स्थिती निवळायची असेल तर सामान्य नागिरकांना सुरक्षा दलांचा त्रास होऊ नये असे वाटल्यामुळे तत्कालीन केंद्र व राज्य सरकारांच्या प्रमुखांनी तसा निर्णय केला. त्यामुळे २००३ पासून हा जम्मू काश्मीरमधील महत्त्वाचा महामार्ग सुरक्षा दलांच्या गाड्या ये-जा करीत असतानाही अन्य नागरी वाहनांसाठीही खुला झाला. सुरक्षादलांच्या ताफ्याजवळून नागरी गाड्या जाऊ शकतात, ओव्हरटेक करू शकतात, लष्करी दलाच्या दोन वाहनांच्या मधूनही नागरी गाड्या प्रवास करू शकतात अशी मोकळीक काश्मिरी जनतेसाठी केंद्र सरकारने देऊन ठेवलेली होती. पण, आता ती सवलत काढून घेतली जाईल असे दिसते.
जेव्हा जेव्हा सुरक्षादले, लष्करी व निमलष्करी गाडड्यांचा ताफा निघतो त्याआधी सुरक्षेची काळजी घेतली जाते. तसेच परवाही झालेच होते. बर्फवृष्टी होते, पाऊस असतो, हवामान वाईट असते तेव्हा हा महामार्ग दोन-दोन दिवस बंद राहतो. मागील आठवड्यात तसा तो चार दिवस बंद राहिला होता. काश्मीर खोऱ्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच सीआरपीएफच्या ६१ कंपन्या तैनात आहेत. तुमारे ६५ हजार जवान त्यात कार्यरत आहेत. त्यामुळेच दररोज शेकडो जवानांना जम्मूहून श्रीनगरला वा उलट दिशेने प्रवास करावा लागतो. साधारणतः एकावेळी एक हजाराहून अधिक जवान प्रवास करणार नाहीत असे पाहिले जाते. पण जेव्हा बर्फ वा पावसामुळे रस्ता बंद राहतो तेव्हा नाईलाज असतो. ४ फेब्रुवारी रोजी म्हणजे पुलवामा घटनेच्या आठ दिवस आधी याच रस्त्यावरून याच दिशेने केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अडीच हजारांहून अधिक जवान ९१ वाहनांमधून गेलेच होते. परवाच्या ताफ्यात ७१ गाड्या होत्या. त्यामुळे सुरक्षाविषयक ठरलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी याहीवेळी केली गेलीच होती. ताफ्याच्या आधी बाँबशोधक पथकाने पाहणी केलेली होती. रस्ता मोकळा करणे किंवा रस्त्याची पूर्वतपासणी करणे हेही केले गेले होते. याहीआधी अशाचप्रकारे लष्करी, निमलष्करी दलांच्या वाहनांच्या ताफ्यात मोटारीमधून स्फोटके आदळवण्याची घटना, ताफ्यावर गोळीबार, रॉकेटने हल्ले होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. पण या वेळेइतके जवान त्यात कधी दगावले नव्हते.
सतत मृत्यूच्या दाढेतच काश्मिरातील जवान वावरत असतात. कधीही व कुठूनही स्फोटकांचा मारा होऊ शकतो, गोळीबार होऊ शकतो, हा सारा धोका पत्करूनच हे जवान तिथे वावरत असतात. पुलवामा घटनेत आयईडीसह स्फोटकाचा वापर केला गेला. गेल्या वर्षभरात नऊ वेळा आयईडी स्फोटकाचा वापर करून काश्मीरमध्ये स्फोट घडवले गेले. त्यातील दोन प्रकार तर पुलवामा इथेच घडले होते. सुदैवाने त्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सीआरपीएफच्या गाड्यांवर बाँब व स्फोटकांचे हल्ले याआधी झालेच आहेत. २०१३ मध्ये मोठा ताफा येण्याच्या आधी रस्ता सुरक्षित करण्यासाठी पुढे जाणाऱ्या वाहनावर हल्ला झाला होता. एक जवान त्यात ठार झाला होता. पुलवामा इथेच दुसऱ्या बाँबशोधक वाहनावर २०१४ मध्ये तसाच हल्ला झाला. ७ डिसें २०१५ मध्ये सीआरपीएफ गाड्यांच्या ताफ्यावर पंपोर गावात हल्ला झाला होता. यात पाच जवान जखमी झाले होते. २०१६ मध्ये तर २० फेब्रुवारी व पुन्हा २५ जून अशा दोनवेळा सीआरपीएफच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ले झाले. त्यात अनुक्रमे दोन व आठ जवान शहीद झाले होते. जुलै २०१७ मध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात सात यात्रेकरू दगावले होते.
भारत धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर जनतेमध्ये उसळलेला शोक व संताप, अस्वस्थता थोडीफार कमी झाली आहे. पण भारताचे हे चोख उत्तर असेल काय? एअर चीफमार्शल (नि.) जयंत चिटणीस यांनी म्हटले आहे की, भारताने मर्यादित स्वरूपातील जबर बाँबहल्ले करावेत. त्यामुळेच पाक लष्कराला मोठा झटका बसेल व त्यांचे डोके ठिकाणावर येईल. हे बाँब व रॉकेट हल्ले करण्यासाठी आपल्याकडे सक्षम विमानांचे ताफे आहेत आणि भारतीय हवाई हद्दीमधूनच हे हल्ले करता येतील असे आधुनिक प्रीसिजन बाँब व गायडेड मिसाईलदेखील आपल्याकडे आहेत. आपल्या लष्कराचे व सैनिकांचे हात कारवाईसाठी, चोख उत्तर देण्यासाठी नक्कीच शिवशिवत असतील. पण साऱ्या स्थितीचा एकूण विचार होईल आणि मग कारवाईचे स्वरूप व वेळ नक्की होईल यातही शंका नाही.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी