Details
“‘बहुजन वंचितां’चे एैक्य, प्रस्थापित हादरले!”
01-Jul-2019
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
लोकसभा निवडणुकीच्या माहोलात युती, आघाडी, महाआघाडी, छोट्या-मोठ्या पक्षांनी गुडघ्याला बाशिंग बांधून आपला घोडा, वांजत्री अन् वरातीला येणार्या पाहुण्या-रावळ्यांची गर्दी जमवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा हे महाराष्ट्र व देशातील सत्ता भोगणारे व भोगलेले पक्ष. या पक्षांत जातीची गर्दी आणि जातीचे दर्दी पाहून एव्हाना निवडणुकीसाठी तिकिटवाटपही ठरल्यानुसार झाले असेल. अगदी फिक्स नावा-आडवांनुसार. त्यात कुटूंब, घराणेशाहीचा नंबर पहिला लागला असेल. पक्षात वर्षानुवर्षेे सतरंज्या उचलणारे व आजही कामावरून जातीनिहाय ओळखल्या जाणारे अलुतेदार-बुलतेदार या सत्तापदांपासून आजही कोसो मैल दूर कसे राहतील, हा पंचवार्षिक कार्यक्रम स्वातंत्र्याची 70 वर्षे लोटल्यानंतरही प्रस्थापितांकडून एकदिलाने सुरू आहे. चुकून-माकून वंचितातला एखाद-दुसरा आमदार, खासदार अथवा मंत्री झालाच तर तोही प्रस्थापितांच्या पंक्तीत घुटमळणारा. त्यांच्याच कलानुसार गाणे गाणारा. हे वर्षानुवर्षांचे चित्र आता बदलायचे. सत्तापरिवर्तन घडवायचे, भाकरी उलटायची. आपल्या तेल्या-तांबोळ्यांचा, भटक्या विमुक्तांचा पुढारीही दिल्लीची संसद आणि महाराष्ट्राचं विधानभवन गाजविण्यासाठी तेथे पाठवायाचा, ही प्रतिज्ञा घेऊन दादरच्या शिवाजी महाराज पार्कवर वंचितांच्या एैक्याचा आवाज चहूबाजू घुमला.
अठरापगड जातींची एकत्र मोट बांधून स्वराज्याचे तोरण बांधणार्या छत्रपती शिवाजी महाराजांनाही या स्वाभिमानी जनतेचा आवाज ऐकून नक्कीच हेवा वाटला असता. वंचित सारे एक होऊ , सत्ता आपल्या हाती घेऊ! बेबंदशाही, घराणेशाही, धर्मांध शक्ती आणि जातीपातींत भांडणे लावणार्यांविरोधात उठलेला हा आवाज गेल्या महिनाभरापासून संबंध महाराष्ट्रभर घुमतो आहे. या वादळाचे नाव आहे, वंचित बहुजन आघाडी. हे वादळ शनिवार 23 फेब्रुवारी 2019 रोजी ऐतिहासिक शिवाजी महाराज पार्कवर व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे आपला देह ठेवला त्या चैत्यभूमीवर अथांग महासागराच्या साक्षीने धडकले. अतिविराट रूपात जमलेला हा जनसमुदाय भाडोत्री गर्दी होता का? तर अजिबात नाही. महाराष्ट्राचा कानाकोपरा, मुंबई, ठाणेसह उपनगरांतून पदरमोड करून या गर्दीचा आपसूकच भाग बनलेल्या प्रत्येक वंचिताला बदल हवा होता. पर्याय हवा होता. तीच व्यवस्था, नाचवणारे, सजवणारे तेच तेच सत्तेचे चेहरे-मोहरे बदलण्याचा हुंकार त्यांच्या मुखी होता. भगवा, निळा, पिवळा, हिरवा हे जातीपातींचे टिळे शिवाजीपार्कच्या भूमीवर गळून पडले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने या वंचितांचा नेता आणि आवाज इथल्या प्रस्थापितांना धडकी भरवत आहे. तो आवाज देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून दिल्लीचे तख्त गाजवण्यासाठी निनादला. ही सामान्य माणसांची गर्दी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून टिमकी वाजवणार्यांना मात्र दिसली नाही. कुणाला अंधूक, कुणाला पूर्ण तर कुणाला पुसट दिसूनही न दिसल्यासारखी वाटली. अगदी संपादकीय भाषेत सांगायचं तर कुणी पहिल्या पानावर ठसठशीत तर कुणी आतल्या पानांत दखल घ्यायलाच हवी म्हणून लाजेखातर वंचितांना स्थान दिले. बाकी सोकॉल्ड आणि वंचितांच्या शब्दांत सरकारचे दलाल बनलेल्या माध्यमांनी आपली पॉलिसी अगदी बरोबर जपली. शिवाजीपार्कवर गर्दीच्या अनेक सभा गाजल्या. एकपात्री प्रयोगांनी या सभाही जिंकल्या. पण, ही सभा खर्या अर्थाने जिंकली ती वंचितांनी. कोळी, माळी, तेली, धनगर, कैकाडी, पारधी, वर्गाबाहेरचा तृतीयपंथी अशा महाराष्ट्रातील अठरापगड जातसमुहांतील प्रत्येक प्रतिनिधिला आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे विचारांचं व्यासपीठ मिळालं. त्या प्रत्येकाने या संधीचं सोनं करून दाखवलं.
संविधानाच्या चौकटीनुसार आजही आम्हाला आमचे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक अधिकार मिळाले का? हा रोकडा सवाल लोकशाहीत ठोकशाही, घराणेशाही आणि धर्मसत्ता चालवणार्यांना पुसला गेला. नवपेशवाईला, आधुनिक मनुला मातीत गाडण्यासाठी वंचितांच्या अलोट गर्दीने नारा दिला. वंचितांमधी कुणी एकीच्या झेंड्याखाली आला तर तो फोडाफोडीसाठी आणि दुभंगला तर तो आपल्या मतपेढीसाठी या प्रस्थापितांच्या अपप्रचाराला आता भीक घालू नका! वंचितांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताधिकार गाजवा! ही जागरूकता वंचितांमधून सत्तेची कमान हाती घेणारच, हा विश्वास दाखवत होती. ओबीसींच्या हक्क परिषदेत मुंबईचा खरा मालक आणि राजा असलेल्या कोळ्यांचा, कामगार, श्रमिकांचा आवाजही घुमला. मुंबईतील गावठाणे, कोळीवाडे आज एसआरएच्या चौकटीत आणून इथल्या उरल्यासुरल्या कोळीबांधवांना मुंबईबाहेर फेकण्याचा विडा सरकारने उचलला आहे. या बिल्डरधार्जिण्या लोकप्रतिनिधींना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी वंचितांनी दिलेला हा नाराही इतिहासच. कारण ‘जे इतिहास विसरता ते इतिहास घडवू शकत नाहीत’, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार वंचितांच्या एैक्याची पेरणी आता महाराष्ट्रभर करतो आहे.”
“विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान