Details
धोका संपलेला नाही!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
अभिनंदन वर्थमान सुखरूप परत आला याचा आनंद देशभर साजरा केला जात असताना एका लष्करी अधिकाऱ्याने काढलेले उद्गार महत्त्वाचे आहेत. तो म्हणाला की, आपला शूरवीर परत आला हे चांगलेच झाले, पण त्यात फार आनंद मानण्याचे कारण नाही. कारण त्याला परत करावेच लागले. पाकिस्तानाला तसे करणे भाग पाडले गेले हे महत्त्वाचे आहे. त्यांनी माहिती दिली की आपल्या अनेक अभिनंदन वर्थमानांना पाकने अत्यंत वाईट पद्धतीने ठार केले आहे. आणखी किमान पन्नास शूर जवान जे सीमेवरून गायब झाले अथवा नजरचुकीने पाक हद्दीत गेले ते पाकच्या तुरूंगात खितपत पडलेले आहेत. मुळात आपल्या तुरुंगात भारतीय सैनिक आहेत हेच पाकिस्तान मान्य करत नाही. त्यांचे अस्तित्त्वच मान्य करत नाही, त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न तरी कसे करणार हा सवाल आहे. पण भारतीय युद्धकैद्यांना अमानुष पद्धतीने वागवण्याची पाकची पंरपराच आहे. ती भंग करता येईल तेव्हा आपण मोठा आनंद साजरा करू शकू असे या अधिकाऱ्याचे सांगणे आहे.
भारताच्या पुरातन (65 वर्षांचे जुने विमान आहे हे) मिग 29 ने, अत्याधुनिक एफ-16 विमान खाली पाडले याचे प्रचंड आश्चर्य अमेरिकेत व्यक्त होत आहे! अभिनंदनच्या धैर्याची, शौर्याची आणि कर्तव्य परायणतेची मात्र दाद द्यावीच लागेल. त्याचे विमान कोसळत असताना तो पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडला. तो प्रदेश काश्मीरचाच असला तरी हद्द मात्र पाकची होती. पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याचे मिग 29 विमान कोसळले होते. पॅराशूट खाली येताच काही स्थानिक लोक त्याला मारण्यासाठीच धावून येताना दिसले. अभिनंदनकडे असणाऱ्या पिस्तुलाच्या सहाय्याने त्याने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोरही सशस्त्र होते. त्यातील एकाने गोळी चालवली ती अभिनंदनच्या पायाला चाटून गेली. त्याला मारहाणही तिथे झाली. नंतर पाक सैनिकांनी त्याला ताब्यात घेतले.
पाकिसातनी अधिकाऱ्यांनी त्याला खोचक शोधक प्रश्न विचारून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण अभिनंदनने त्यांना दाद दिली नाही. “तू कुठे राहतोस? तुझे मिशन काय होते?” असे प्रश्न त्याला विचारले गेले, त्याने तोंड बंदच ठेवले. पण शूर सैनिक जी माहिती शत्रूपासून दडवून ठेवत होता तीच माहिती, भारतीय टीव्ही चॅनेलवाले, अतिउत्साही, अतिशहाणे पत्रकार जाहीर करून टाकत होते. नेहमीप्रमाणेच याहीवेळी तोच अनुभव आला. या संदर्भातील कितीतरी उपहासात्मक पोस्ट फेसबुक व व्हॉट्सअपवरून फिरत होत्या. युद्धस्थितीत आपल्या शूर सैनिकाचे प्राण शत्रूच्या ताब्यात आहे, तो संकटात आहे, अशावेळी त्याची अडचण अधिक वाढेल अशा बातम्या आपण देताच कामा नयेत याचे भान का उरले नाही हा सवाल आहे. अशा स्थितीत कशा बातम्या द्याव्यात किंबहुना काय दाखवावे व काय दाखवू नये याचे भान भारतीय टीव्ही मीडियाला कधी येणार? अमेरिका व युरोपमध्ये अतिरेकी हल्ल्यावेळी अथवा आपला एखादा सैनिक शत्रूच्या ताब्यात असतो अशावेळी बातम्या देण्याची पद्धत निराळी आहे. त्याचा अंगिकार भारतीय मध्यमांनी तातडीने करायला हवा. त्यासंबंधी भारतीय खाजगी वृत्तवाहिन्यांची जी संघटना आहे, इंडियन ब्रॉडकास्टर्स असोसिएशन, त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा. सेसन्सॉरशिप नक्कीच नको, पण सेल्फ सेन्सॉरशिप मात्र नक्कीच हवी, असे या संदर्भात नमूद करावे लागेल.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदनच्या सुटकेच्या बदल्यात भारताने सुरू केलेली कडक कारवाई थांबवावी असी अपेक्षा व्यक्त केली. ही अपेक्षा पूर्णतः चुकीची होती. एक तर भारताने मुळात कुरापत काढलेलीच नाही. पाकने आपल्या बगल-बच्चा अतिरेक्यांना मोकळीक दिली, पैसा पुरवला, तंत्रसहाय्य दिले, प्रशिक्षण दिले आणि भारतात घुसवलेही! शिवाय फार मोठ्या प्रमाणात स्फोटकांचे साठेही पुरवले. त्यानंतरच जैशच्या काश्मीरमधील माथेफिरू तरूणांनी भारतीय सुरक्षा व्यवस्थेवर भीषण हल्ला चढवला. तुमच्या सीमेच्या आत जैशचा मुख्य मसूद अझर दडलेला आहे आणि तुम्ही शांतता भारताने ठेवावी अशी अपेक्षा करता हेच मुळात चूक आहे. शिवाय अभिनंदनला पकडल्यानंतर त्याला युद्धकैद्याची सन्मानाची वागणूक दिली जायला हवी होती. त्याचा छळ केला गेला. तो जखमी झाला. त्याला छळून माहिती घेण्याचा प्रयत्न पाक लष्कराने केला. त्याचे जखमी अवस्थेतील व्हीडिओ प्रकाशित करून भारतीयांच्या भावना भडकवण्याचा उद्योगही पाकने केला. हे सारे करण्यालाच जिनिव्हा करारान्वये बंदी आहे! कोणत्याही युद्धमान राष्ट्रांनी एकमेकांच्या युद्धकैद्यांना सन्मान द्यायला व तत्काळ मायदेशी परत पाठवायला हवे असे हा आंतरराष्ट्रीय करार सांगतो. त्याचे पालन करून इम्रानने भारतावर मुळीच उपकार केलेले नाहीत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गेल्या पाच वर्षांत जगभरातील राष्ट्रांबरोबरचे भारताचे संबंध अधिक सुधारले, मैत्री वाढवली, अनेक राष्ट्रांबरोबर सामंजस्य तसेच गुंतवणुकीचे उभयपक्षी करारही घडवले. त्या साऱ्या राजनैतिक खटाटोपाची फळे आता, या युद्धसदृष्य प्रसंगात, भारताला मिळत आहेत! काँग्रेससह सारेच विरोधी पक्ष गेली चार-पाच वर्षे बोंबा मारत राहिले: “मोदी सारखे परदेशात का जातात? जाऊन तिथे हे करतात काय? ते देशात कधी दिसणार?” असे प्रश्न ही मंडळी विचारत राहिली. त्यासंदर्भात अनेक विनोदही समाजमाध्यमांतून फिरवले जात होते. त्या साऱ्या विरोधकांनी तोंडात बोटे घालावीत अशा पद्धतीने भारताच्या बाजूने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व रशिया हे उभे राहिले आहेत. जागतिक समुदायामध्ये भारताचे स्थान किती व कसे उंचावले आहे हे चीनने या प्रसंगात जी भूमिका घेतली त्यातून स्पष्ट झाले आहे. चीनने जैशला संरक्षण देऊ नका असेच जणू पाकला बजावले आहे. पाकिस्तानच्या भूमीवरून चीनची विमाने उडणार नाहीत हा त्यांचा ताजा निर्णय़ पाकला अस्वस्थ करणारा आहे. पाकिस्तान मनातून हादरावे असाच निर्णय अचानक आलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतही चीन आता पाकला पाठीशी घालणार नाही, मसूद अझरला अतिरेकी घोषित करण्याच्या ताज्या ठरावावर नकाराधिकार वापरणार नाही, असे संकेत मिळत आहेत. गेली जवळपास दहा वर्षे अझरची व जैशचीही पाठराखण चीनने पाकच्या सांगण्यावरून केली होती. ती भूमिका आता बदलताना दिसत आहे. हे भारताच्या परारष्ट्र धोरणाचे मोठेच यश आहे.
मोदी व सुषमा यांनी आणखी एक जबरदस्त राजनैतिक चमत्कार घडवून दाखवला आहे. इस्लामी राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या बैठकीसाठी भारताला विशेष निमंत्रित म्हणून मुद्दाम बोलावण्यात आले. पाकिस्तानच्या याह्याखानांच्या सांगण्यावरून 1969 पासून इस्लामिक राष्ट्रे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेने भारतावर बहिष्कार टाकलेला होता. परिषदेतील सहभागापासून भारताला रोखण्यात आले होते. अबुधाबीचे राजे जेव्हा भारताच्या भेटीवर आले तेव्हा त्यांनी परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना दिले होते. ही प्रक्रिया गेल्या वर्षापासून सुरू होती. बांगला देश या संघटनेचा मावळता अध्यक्ष आहे. त्यांनी गेल्या वर्षीच भारताला निमंत्रित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो यावेळी मान्य झाला. जैशच्या हल्ल्यानंतर भारताने पाक हद्ददीत विमाने घुसवून जैशचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर भारताला दिलेले निमंत्रण रद्द करा असा आग्रह पाकने धरला होता. पण त्याला सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींनी मुळीच धूप घातली नाही. पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रावर त्या कारणासाठी बहिष्कार टाकला. पण त्यानेही इस्लामी देश बधले नाहीत. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे जगी स्वागत अबुधाबीमध्ये केले गेले आणि त्यांनी तिथे जोरदार भाषणही ठोकले. “इस्लाम हा शांततेचा धर्म आहे. तिथे धर्माच्या नावावर हिंसेला स्थान नाही” असे त्यांनी अरब देशात जाऊन मुस्लीम राष्ट्रांच्या या शिखर परिषदेमध्ये बजावले, हे महत्त्वाचे. त्यापेक्षाही हे अधिक महत्त्वाचे आहे की भारतात जिहादच्या नावावर हिंसेचे तांडव करू पाहणाऱ्या एका मुस्मीम देशाच्याच विरोधातील ही भूमिका भारताने मुस्लीम राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या व्यासपीठावर जाऊन मांडलेली आहे.
अभिनंदनच्या सुटकेचे आमिष पुढे करायचे व भारतात पुन्हा नव्याने कुरापती काढायच्या हा उद्योग पाकने सुरूच ठेवलला आहे. मात्र भारतीय सैन्याने आपली युद्धसज्जता जराही कमी केलेली नाही. लक्ष्य सिनेमात एक जुना जाणता सैनिक त्याच्या अधिकाऱ्याला सांगतो की, “तुम्ही विजयी होऊन, शिखरावर पोहोचलात, तरी थोडेही सुस्तावू नका. कारण पराभूत झालेला पाकिस्तानी परत पलटून हल्ला करणारच हे विसरू नका!” तसेच सध्या सुरू आहे. गुजरात, राजस्थान, पंजाब व जम्मू काश्मीरच्या संपूर्ण सीमेवर भारताचा खडा पाहरा सुरू आहे. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या विमानविरोधी तोफा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. काश्मीर सीमेवर पाकचे गोळीबाराचे प्रमाण वाढले आहे. ताजी बातमी अशी आहे की भारताने पश्चिम समुद्रात आयएनएस कलवारी ही अत्याधुनिक पाणबुडीही उतरवलेली आहे!”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी